‘समर स्पेशल’ धमाका!

By Admin | Updated: March 20, 2015 01:56 IST2015-03-20T01:56:14+5:302015-03-20T01:56:14+5:30

उन्हाळी सुटीनिमित्त (समर स्पेशल) मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने तीच संधी साधत भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष ट्रेनचा धमाकाच लावला आहे.

'Summer Special' Explosion! | ‘समर स्पेशल’ धमाका!

‘समर स्पेशल’ धमाका!

प्रवाशांसाठी खूशखबर : आतापर्यंत मध्य रेल्वेकडून ३२२ ट्रेनची घोषणा
मुंबई : उन्हाळी सुटीनिमित्त (समर स्पेशल) मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने तीच संधी साधत भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष ट्रेनचा धमाकाच लावला आहे. आतापर्यंत मध्य रेल्वेकडून ३२२ उन्हाळी विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे.
काही शाळा आणि कॉलेजला सुटी लागताच एप्रिल ते मे या तीन महिन्यांत अनेक जण आपल्या कुटुंबीयांसह गावी जातात किंवा अन्य पर्यटनस्थळ गाठतात. या तीन महिन्यांत मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या पाहता मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ३२२ उन्हाळी विशेष ट्रेन सोडण्यात आल्या असून, ९७ प्रिमियम आणि २२५ नॉन प्रिमियम ट्रेन आहेत. मागणीनुसार तिकिटांची किंमत प्रिमियममध्ये वाढत असल्याने गर्दीच्या वेळेत या ९७ ट्रेन सोडण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यात महाराष्ट्रातील कोल्हापूर, धुळे, नागपूर, भुसावळ, सोलापूर, करमाळी, मडगावसाठी सोडण्यात येणाऱ्या ट्रेनचा समावेश आहे; तर महाराष्ट्राबाहेरील लखनौ, वाराणसी, एर्नाकुलम, तिरुनेलवेल्लीसाठीच्या ट्रेनचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही, असे मत मध्य रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले.

156 ट्रेनमध्ये मुंबई-नागपूर प्रिमियम सुपरफास्टच्या २६, एलटीटी-गोरखपूर प्रिमियम विशेष २६, एलटीटी-वाराणसी प्रिमियम विशेष २४, एलटीटी-करमाळी एसी सुपरफास्ट विशेष २२, एलटीटी-लखनौ एसी सुपरफास्ट विशेष ४, दादर-भुसावळ सुपरफास्ट विशेष २८, सोलापूर-नागपूर विशेष २६ ट्रेन सोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

27मार्चपासून या ट्रेन सुरू होणार असून, जूनच्या अखेरपर्यंत त्या धावतील. यातील सोलापूर ते नागपूर, दादर ते भुसावळ, एलटीटी-लखनौ आणि एलटीटी-करमाळी ट्रेनचे आरक्षण २१ मार्चपासून सुरू होत आहे.

कोकण रेल्वेच्या विशेष ट्रेन : कोकण रेल्वेकडून मडगाव ते सीएसटीसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. 00११२ ट्रेन मडगावहून २२ मार्च रोजी १६.00 वाजता सुटून सीएसटी येथे दुसऱ्या दिवशी ६.१५ वाजता पोहोचेल. तर 00१११ ट्रेन
२३ मार्च रोजी सीएसटीहून ११.0५ वाजता सुटून मडगावला २३.३0 वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे २१ मार्च रोजी सीएसटी ते करमाळी ट्रेन सोडण्यात येत असून, 0१00१ ट्रेन सीएसटीहून 00.३0 वाजता सुटून करमाळी येथे १२.00 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१00२ करमाळी येथून १६ वाजता सुटून सीएसटी येथे ६.१५ वाजता पोहोचेल.

Web Title: 'Summer Special' Explosion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.