उन्हाळ्याच्या झळा पर्यटननगरीतही
By Admin | Updated: April 28, 2016 01:03 IST2016-04-28T01:03:33+5:302016-04-28T01:03:33+5:30
घाट माथ्यावरील पर्यटननगरी व थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहराचा पारा सोमवारी ३६ अंशावर होता.

उन्हाळ्याच्या झळा पर्यटननगरीतही
लोणावळा : घाट माथ्यावरील पर्यटननगरी व थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहराचा पारा सोमवारी ३६ अंशावर होता. शहर परिसरातील तापमान चाळिशीच्या उबंरठ्यावर असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेदेखील मुश्कील झाल्याने बाजारपेठा व रस्ते ओस पडल्याचे चित्र होते.
या वर्षी राज्यात सर्वत्र कडक उन्हाळा जाणवत आहे. अनेक ठिकाणी उष्माघाताचे बळी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. या कडक उन्हाळ्याच्या झळा पर्यटनाचे व थंड हवेचे प्रसिद्ध असलेले मध्यवर्ती लोणावळ्याला बसल्या आहेत. वातावरणातील बदल व नागरीकरणामुळे पारा ३६ अंशावर जाऊ लागल्याने रस्त्यांवर फिरणे मुश्कील झाले आहे.
पर्यटकांच्या संख्येतदेखील यामुळे घट झाल्याने पर्यटनावर अवलंबून असलेल्या हॉटेल व्यवसायासह चिक्की, रिक्षा, लहान-मोठे विक्रेते, फेरीवाले या सर्वांना याचा फटका बसला आहे. दुपारी रस्त्यांवरून चालताना उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. वेळीच ही वाटचाल रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.