शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

सुमारतेची टीका ‘निरर्थक’ , साहित्य माहित नाही म्हणून बोलणे चुकीचे - लक्ष्मीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:45 IST

लेखकाच्या साहित्यावर टीका केली तर समजू शकतो. पण केवळ लोकांना त्यांचे साहित्य माहीत नाही म्हणून लेखकांना‘सुमार’ ठरवणे हे योग्य नव्हे. लोक वाचत नाहीत हा दोष लेखकाचा नाही. लोकप्रियता आणि वाडमयता या दोन गोष्टींमध्ये जमिन-आस्मानाचा फरक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लेखकाच्या साहित्यावर टीका केली तर समजू शकतो. पण केवळ लोकांना त्यांचे साहित्य माहीत नाही म्हणून लेखकांना‘सुमार’ ठरवणे हे योग्य नव्हे. लोक वाचत नाहीत हा दोष लेखकाचा नाही. लोकप्रियता आणि वाडमयता या दोन गोष्टींमध्ये जमिन-आस्मानाचा फरक आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षांवर होणारी सुमारतेची टीका ही निरर्थक आणि अजाणतेपणातून होणारी आहे,अशा शब्दात नवनिर्वाचित अध्यक्ष माजी प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी संमेलनाध्यक्षांवर ‘सुमार’तेचा ठपका ठेवणा-या टीकाकारांचा समाचार घेतला.बडोदा येथे होणा-या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख यांच्या गळ्यात विजयाची माळ पडल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. संमेलनाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी पसरताच देशमुख यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह साहित्य-प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले. देशमुख यांची पत्नी अंजली देशमुख यांनी पेढा भरवत त्यांना शुभेच्छा दिल्या. देशमुख यांनी लोकमान्य टिळक, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला पुुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, अक्षयकुमार काळे यांनी आपल्या लेखनातून साहित्यसंपदा समृद्ध केली, असे असतानाही संंमेलनाध्यक्षांवर ‘सुमार’तेचा ठपका ठेवण्यात आला, त्याविषयी छेडले असता देशमुख यांनी टीकाकारांनाच लक्ष्य करीत माजी संंमेलनाध्यक्षांची पाठराखण केली.ते म्हणाले, लेखक हा लोकप्रिय नसतो. तो लेखनामधून आपले विचार लोकापर्यंत पोहोचवत असतो. आपल्या परीने तो साहित्यामध्ये स्वत:चे योगदान देण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र लेखकांचे साहित्य लोक वाचत नाहीत हा दोष त्यांचा नसतो. त्यांची पुस्तक न वाचता केलेली टीका किती मान्य करायची हा प्रश्न आहे. त्यामुळे सुमारतेची केली जाणारी टीका ही निरर्थक आणि अजाणतेपणाची केली जात असल्याचे त्यांनीस्पष्ट केले.निमंत्रितांनी मानधन घेऊ नये, या आयोजकांच्या आवाहनाला पाठिंबासाहित्य संमेलनात सहभागी होणाºया निमंत्रितांनी मानधन घेऊ नये असे आवाहन आयोजक संस्थेने केले आहे. हा विषय सध्या साहित्यवर्तुळात चांगलाच गाजत आहे. मात्र संमेलन कमी खर्चात व्हावे अशी आयोजकांची भावना आहे. ज्या साहित्यिकांना शक्य आहे त्यांनी आपणहून मानधन नाकारायला हवे असे सांगून देशमुख यांनी आयोजकांच्या आवाहनाला पाठिंबा दर्शविला.बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्याची मागणी करणारमराठी भाषेचा प्रश्न हा गंभीर बनला आहे. मराठी भाषा जगवायची असेल तर एका पिढीतून दुसºया पिढीमध्ये मराठीचा प्रसार होणे आवश्यक आहे. त्यामुळे बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्याची मागणी शासनाकडे करणार आहे. तसेच बृहन्महाराष्ट्र भाषा विभाग स्थापन करणे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविलाच पाहिजेसंमेलनाध्यक्ष कोणत्याही प्रश्नासंदर्भात व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवताना दिसत नाहीत, याबद्दल विचारले असता व्यवस्थेविरुद्ध बोलल्यामुळेच प्रशासकीय अधिकारी असताना चारदा बदलीला सामोरे जावे लागले, यातच सगळे आले अशी मिश्कील टीप्पणी देशमुख यांनी केली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. विवेकवादी लोकांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. विवेकवादी पद्धतीने चिकित्सा करून आपले प्रश्न मांडता आले पाहिजेत.संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद आहे. अर्ज भरल्यापासूनच मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे विजयाची आशा होती. माझ्यावर मतदारांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे. संमेलनाध्यक्ष हे अत्यंत मानाचे पद आहे. मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे.- लक्ष्मीकांत देशमुखलक्ष्मीकांत देशमुख यांचा अल्पपरिचयजन्म : ५ सप्टेंबर १९५४४मूळगाव; मुरूम, ता.उमरगा, जि.उस्मानाबाद, सध्या- मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर पुणे४शिक्षण: एम. एस्सी (केमिस्ट्री)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, एम. ए. (मराठी साहित्य)- शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर, एमबीए (पब्लिक पॉलिसी)- इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मँनेजमेंट, बँगलोर (आय आय.एम) सर्टिफिकेट कोर्स इन इंटरनॅशनल पॉलिसी-सिरँक्युस युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क अमेरिका४करिअर : भारतीय प्रशासन सेवा. माजी सनदी अधिकारी, माजी जिल्हाधिकारी, कोल्हापूर, माजी एम.डी फिल्मसिटी, गोरेगाव मुंबई४सध्या शैक्षणिक सल्लागार- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक, विश्वस्त-श्री ज्ञानेश्वर संस्थान समिती आळंदी४साहित्य संपदा :४कादंबरी : सलोमी ( दोन लघु कादंब-या) होते कुरूप वेडे, अंधेरनगरी, आॅक्टोपस, इन्किलाब विरुद्ध जिहाद आणि हरवलेले बालपण४कथासंग्रह : कथांजली, अंतरीच्या गूढगर्भी, पाणी! पाणी!!, नंबर वन, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी, अग्नीपथ आणि मृगतृष्णा४नाटके/ बालनाटके :४अखेरची रात्र आणि दूरदर्शन हाजिर हो...४ललितेतर साहित्य : प्रशासननामा, बखर भारतीय प्रशासनाची, अविस्मरणीय कोल्हापूर, मधुबाला ते गांधी४संपादित : लक्षदीप (लक्ष्मीकांत देशमुख यांचे निवडक साहित्य), अन्वयार्थ(लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्याची समग्र समीक्षा) आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम४इंग्रजी साहित्य : द रिअल हिरो अँड अदर स्टोरीज, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन्स गुड अँड ग्रेटनेस आणि करिष्मँटीक कोल्हापूर४हिंदी साहित्य : खोया हुआ बचपन ( प्रकाशनाच्या मार्गावर)४स्फुट साहित्य : नाती जपून ठेवा (नातेसंबंधावरील लेखमाला) आणि बी पॉझिटिव्ह (लेखमाला)४पुरस्कार : महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य पुरस्कार, साहित्यदीप पुणे पुरस्कार, प्रेरणा आर्ट फौंडेशन कलागौरव पुरस्कार, महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार, नँसकॉम सोशल इंपँक्ट अँवार्ड -सेव्ह द बेबी गर्ल आय.टी साठी पुरस्कार, टाईम्स आॅफ इंडिया सोशल आॅनर अँवार्ड, आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार४दुसºया शासकीय कर्मचारी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष( २0१0), तिसरे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन , नागपूर (२0११), तिसरे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन, अध्यक्ष, नागपूर (२0११), पहिले डोंगरगाव जि.सांगली लोकजागर साहित्य संमेलन, अध्यक्ष (२0१५), ३८ वे मराठवाडा साहित्य संमेलन नांदेड, फेब्रुवारी (२0१५)

टॅग्स :marathiमराठीPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र