सुलभा देशपांडे, सावरकरांना जीवनगौरव
By Admin | Updated: June 4, 2015 04:27 IST2015-06-04T04:27:24+5:302015-06-04T04:27:24+5:30
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री

सुलभा देशपांडे, सावरकरांना जीवनगौरव
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. हा सोहळा १४ जून रोजी गो.ब.देवल यांच्या स्मृतिदिनी यशवंत नाट्यमंदिर येथे सायंकाळी ७ वाजता संमेलनाध्यक्षा फैय्याज यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी रोख पंचवीस हजार रुपये, शाल,श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे आहे. दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे रंगकर्मींना गौरविण्यात येते. सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कारासाठी अनिल काकडे (गोष्ट कळत-नकळत), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारासाठी मंगेश कदम (गोष्ट तशी गंमतीची), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक पुरस्कारासाठी ‘कळत नकळत’ नाटकाची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता संजय खापरे (जस्ट हलक फुलकं), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्पृहा जोशी (समुद्र), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार राजन भिसे (समुद्र), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना जयदीप आपटे (समुद्र), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत पियुष-साई (ढॅण्टढॅण), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता शंशाक केतकर (गोष्ट तशी गंमतीची), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ज्ञानदा पानसे, सीमा गोडबोले, सर्वोत्कृष्ट नाट्यव्यवस्थापक पुरस्कारासाठी मामा पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यंदा पुरस्कारांची फेररचना केली असून एकूण रंगभूमीच्या सर्वांगाचा विचार करुन ३८ पुरस्कारांची घोषणा केली आहे. सर्वोत्कृष्ट एकत्रापी पुरस्कारासाठी संदीप पाठक, नाट्य परिषद कार्यकर्ता पुरस्कार गुरुनाथ दळवी, नाट्य समीक्षक पुरस्कार शीतल करदेकर, सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटकासाठी ‘संगीत बया दार उघड’, सवोत्कृष्ट प्रायोगिक ‘संगीत नाटकासाठी संगीत स्वयंवर’, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकासाठी ‘न ही वैरेन वैरानी’ यांची निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)