शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

सुखोईवर ब्राह्मोस क्षेपणास्त्र स्वार

By admin | Updated: June 26, 2016 04:56 IST

संपूर्ण भारतीय बनावटीचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानांवर बसविण्याचे तंत्र यशस्वी झाल्याने या क्षेपणास्त्राचा हवेतून अचूक मारा करून, शत्रूचा थरकाप

नाशिक : संपूर्ण भारतीय बनावटीचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानांवर बसविण्याचे तंत्र यशस्वी झाल्याने या क्षेपणास्त्राचा हवेतून अचूक मारा करून, शत्रूचा थरकाप उडविण्याची क्षमता भारतीय हवाई दलाच्या आवाक्यात आली आहे.अडीच हजार किलो वजनाचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र हवाई दलातील ‘एसयू-३० एमके आय’ लढाऊ विमानावर बसविण्याचे तांत्रिकदृष्या आव्हानात्मक काम हिंदुस्तान एअरोनॉटिक्सच्या ओझर कारखान्याने फत्ते केले. असे क्षेपणास्त्र बसविलेल्या एका सुखोई विमानाने येथील एचएएल विमानतळावरून ४५ मिनिटांचे चाचणी उड्डाण यशस्वी करून इतिहास घडविला. अर्थात, सुरक्षेच्या कारणावरून उड्डाणाच्या वेळी प्रत्यक्ष ब्रह्मोस क्षेपणास्त्र सुखोईवर न बसविता तेवढ्याच वजनाचे व आकाराचे ‘डमी’ क्षेपणास्त्र बसविण्यात आले होते. एवढ्या वजनाचे, आवाजाहूनही अधिक वेगाने जाणारे क्रुझ क्षेपणास्त्र लढाऊ विमानावर यशस्वीपणे आरूढ केले जाण्याची जगातील ही पहिलीच वेळ आहे.हवाई दलाच्या बंगळुरु येथील ‘एअरक्राफ्ट अ‍ॅण्ड सिस्टिम्स एस्टॅब्लिशमेंट’मधील विंग कमांडर प्रशांत नायर आणि विंग कमांडर एम.एस. राजू या दोन वैमानिकांनी ब्रह्मोसधारी सुखोईचे उड्डाण केले. यामुळे हवाईदलाची मारक क्षेमता द्विगुणित झाली आहे. अशा प्रकारे हवाई दलातील एकूण ४० सुखोई विमानांमध्ये बा्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेऊन त्यांचा हवा तेव्हा अचूक मारा करण्यासाठी आवश्यक ते फरबदल केले जाणार आहेत. शनिवारचे पहिले चाचणी उड्डाण यशस्वी झाल्यानंतर आता यानंतर अशीच आणखी चाचणी उड्डाणे केली जातील व त्यांचे मूल्यमापन आणिु प्रमाणीकरण केल्यानंतर ब्राह्मोस क्षेपणात्रे औपचारिकपणे हवाईदलाच्या अस्त्रभांडारात मानाचे स्थान घेईल.सुखोई हे मूळचे रशियन बनावटीचे लढाऊ विमान असून त्या देशासोबत झालेल्या समझोत्यानुसार एचएएलच्या ओझर कारख्यान्यात त्यांचे उत्पादन केले जाते. ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचे उत्पादन सार्वजनिक क्षेत्रातील ब्राह्मोस एअरोस्पेस लि. ही कंपनी करते. सुखोई विमानांमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेण्यासाठी अनुरूप असे बदल करण्याचे कंत्राट दोन वर्षांपूर्वी ब्रोह्मोस एअरोस्पेसने दोन वर्षांपूर्वी एचएएलला दिले होते. दोन वर्षात एचएएलने अशी दोन विमाने ब्राह्मोससाठी सज्ज करून दिली आहेत.(प्रतिनिधी)आत्मनिर्भरतेचे एक आव्हान म्हणून आम्ही हे काम हाती घेतले व मूळ रशियन उत्पादकांच्या मदतीशिवाय ते फत्ते केले. ‘मेक इन इंडिया’चे हे आदर्श उदाहरण असून भारताच्या हवाई इतिहासातील तो एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. सर्व संस्थांनी एक मिशन म्हणून एखादे काम हाती घेतले तर काहीच अशक्य नाही, हेच यावरून सिद्ध होते.-टी. सुवर्णा राजू, सीएमडी, एचएएलहे करू शकू, यावर जगाचा विश्वास नव्हता. राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या दूरदृष्टीमुळे हा इतिहास घडवला.- सुधीर कुमार मिश्रा, सीईओ, ब्राह्मोस एअरोस्पेस