म्युनिसिपल मजदूर युनियनच्या अध्यक्षपदी सुखदेव काशिद
By Admin | Updated: October 3, 2016 02:25 IST2016-10-03T02:25:11+5:302016-10-03T02:25:11+5:30
महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे नेतृत्त्व करणाऱ्या म्युनिसिपल मजदूर युनियनच्या अध्यक्षपदी अॅड. सुखदेव काशिद यांची निवड करण्यात आली

म्युनिसिपल मजदूर युनियनच्या अध्यक्षपदी सुखदेव काशिद
मुंबई : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे नेतृत्त्व करणाऱ्या म्युनिसिपल मजदूर युनियनच्या अध्यक्षपदी अॅड. सुखदेव काशिद यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांच्या निधनानंतर हे पद रिकामे झाले होते. मात्र परळ येथील डॉ. शिरोडकर सभागृहात पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काशिद यांची एकमुखाने निवड झाली आहे.
गेल्या ३५ वर्षांपासून काशिद युनियनमध्ये पदाधिकारी म्हणून काम करत आहेत. महापालिका अभियंत्यांच्या संघटनेचेही नेतृत्त्व काशिद यांच्याकडे आहे. त्यामुळे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांच्या प्रश्नांची जाण त्यांना आहे. संघटनेने काशिद यांच्यासोबत अॅड महाबळ शेट्टी यांची निवड सरचिटणीस पदी केली आहे. तर ज्येष्ठ कार्याध्यक्ष म्हणून वामन कविस्कर, कार्याध्यक्ष म्हणून अशोक जाधव आणि कोषाध्यक्षपदी शरद राघव यांची निवड झाली आहे. (प्रतिनिधी)