पुण्यात प्रेमी जोडप्याची रेल्वेखाली आत्महत्या
By Admin | Updated: October 25, 2016 09:53 IST2016-10-25T09:53:47+5:302016-10-25T09:53:47+5:30
पुण्यातील कासारवाडी ते पिंपरी दरम्यान एका प्रेमी युगुलाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.

पुण्यात प्रेमी जोडप्याची रेल्वेखाली आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २५ - एका प्रेमी युगुलाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे पुण्यातील कासारवाडी ते पिंपरी दरम्यान सकाळी सहाच्या सुमारास घडली. मुलाची आणि मुलीची ओळख पटवण्यात यश आले असून दोघांचे मृतदेह वायसीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
तिवारी (वय 25 वर्ष, रा. खारघर, मुंबई) असे मुलाचे नाव आहे. तर रजनी सिंग (वय 18, रा. पिंपरी) असे मुलीचे नाव आहे. ही मुलगी बीसीएला शिकत होती. तिवारीची खारघर पोलीस ठाण्यात तर रजनीची निगडी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल होती. तिचे वडील रुग्णालयात आले असून मुलाच्या वडिलांना बोलावल्याची माहिती पुणे लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव यांनी दिली.