पत्नीला विष पाजून आत्महत्या

By Admin | Updated: June 4, 2017 00:17 IST2017-06-04T00:17:01+5:302017-06-04T00:17:01+5:30

पत्नीला विष पाजून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कवलापूर (ता. मिरज) येथे शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या तरुणाला

Suicides by poisoning wife | पत्नीला विष पाजून आत्महत्या

पत्नीला विष पाजून आत्महत्या

- लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पत्नीला विष पाजून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कवलापूर (ता. मिरज) येथे शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या तरुणाला कर्करोगाची लागण झाली होती. डॉक्टरांनी त्याला दोन महिने जगणार असल्याचे सांगितले होते, यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
शंकर कृष्णा भोसले (२९) व पूजा शंकर भोसले (२५) असे या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांना मयुरी (४ वर्षे) व दर्शन (२ वर्षे) अशी दोन मुले आहेत. महिन्याभरापूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्याने डॉक्टरांकडे तपासणी करून घेतली असता त्याला कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले.
तुझे दोन-तीन महिने आयुष्य आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. यातून दोघांनी जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेऊन आत्महत्येचा मार्ग निवडला. शंकरने पत्नीच्या हाताच्या शिरा कापल्या व तिला विष पाजले.

आत्महत्येपूर्वी चिठ्ठी
शंकर भोसले याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. यामध्ये त्याने ‘मी व पूजा विष पिऊन आयुष्य संपवत आहे. माझी मुले मयुरी व दर्शनचा सांभाळ करा. माझा भाऊ नंदू खूप चांगला आहे. मी पोलीस भरती झालो नाही, पण माझा भाचा अनिल याने भरती व्हावे. माझ्या आई-वडिलांनी खूप कष्ट केले आहेत. त्यांनी आम्हाला माफ करावे’, असे लिहिले आहे.

Web Title: Suicides by poisoning wife