सोनेवाडी येथील कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: June 28, 2016 01:49 IST2016-06-28T01:49:59+5:302016-06-28T01:49:59+5:30

चिखली तालुक्यातील शेतक-याने गळफास घेऊन केली आत्महत्या.

Suicides by a farmer at Sonawadi | सोनेवाडी येथील कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

सोनेवाडी येथील कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

पिंपळगाव सैलानी(जि. बुलडाणा) : चिखली तालुक्यातील रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सोनेवाडी येथील उमेश पुंडलिक जाधव (वय ३५) या शेतकर्‍याने २६ जूनच्या रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २७ जून रोजी सकाळी उघडकीस आली.
मृतक उमेश जाधव यांनी रायपूर शिवारातील जंजाळ यांच्या शेतात निंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्यावर बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँकेचे १ लाख रुपयांचे कर्ज होते. सततच्या नापिकीमुळे ते कर्जाला कंटाळले होते. दिवसेंदिवस दुष्काळाचा सामना करणे त्यांना कठीण झाले होते. कर्जाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ चिंचोले यांनी सदर मृतकाचा पंचनामा करून मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात नेला. पुढील तपास रायपूर पोलीस करीत आहे.

Web Title: Suicides by a farmer at Sonawadi