वडनेरभैरवच्या तरुण शेतकऱ्यांची कर्जाला कंटाळून वीष प्राशन करुन आत्महत्या
By Admin | Updated: May 18, 2016 19:28 IST2016-05-18T19:28:37+5:302016-05-18T19:28:37+5:30
चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथील शेतकरी कोंडाजी रामभाऊ वक्टे (३६ ) यांनी वाढते कर्ज, नापिकी, पाणीटंचाईला कंटाळून आपल्या राहत्या घरी वीष प्राशन करुन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

वडनेरभैरवच्या तरुण शेतकऱ्यांची कर्जाला कंटाळून वीष प्राशन करुन आत्महत्या
वडनेरभैरव - चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथील शेतकरी कोंडाजी रामभाऊ वक्टे (३६ ) यांनी वाढते कर्ज, नापिकी, पाणीटंचाईला कंटाळून आपल्या राहत्या घरी वीष प्राशन करुन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत वडनेरभैरव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली . मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या मुलाबाळासह जेवण उरकले घरासमोर झोपण्यासाठी जात असतांना औषधे ठेवण्याच्या खोलीतुन मुलाने काय घेतले म्हणून वृध्द आई गीताबाई यांना संशय आल्याने त्यांनी घराबाहेर जाऊन कोंडाजी हे औषध प्राशन करुन उलट्या करीत होते. त्यांना तत्काळ पिंपळगाव बसवंत येथे खासगी रुग्णालयात नेले दवाखान्यात भरती करण्याआधीच कोंडाजी यांची प्राणज्योत मालवली. वडनेरभैरव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई गीताबाई , वडील रामभाऊ, भाऊ दत्तु , पत्नी सुनीता, मुलगा खंडेराव, मुलगी साक्षी असा परिवार आहे. ( वार्ताहर)