कर्जमाफीतील त्रुटींमुळे आत्महत्या वाढल्या : शरद पवार लोकमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:23 AM2017-11-16T02:23:09+5:302017-11-16T02:23:23+5:30

राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली तरी त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही. कर्जमाफीचा लाभ देताना चावडी वाचनासारख्या प्रकारातून शेतक-यांच्या अब्रुचा पंचनामा गावासमोर करण्यात आला.

 Suicides caused by debt waiver mistakes: Sharad Pawar Lokmat | कर्जमाफीतील त्रुटींमुळे आत्महत्या वाढल्या : शरद पवार लोकमत

कर्जमाफीतील त्रुटींमुळे आत्महत्या वाढल्या : शरद पवार लोकमत

Next

गडचिरोली : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली तरी त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही. कर्जमाफीचा लाभ देताना चावडी वाचनासारख्या प्रकारातून शेतक-यांच्या अब्रुचा पंचनामा गावासमोर करण्यात आला. हा अपमान सहन करण्याऐवजी शेतकरी विष घेऊन जीव देणे पसंत करीत आहेत. या त्रुटीपूर्ण कर्जमाफीमुळेच शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत, असा ठपका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी सरकारवर ठेवला.
अनेक वर्षानंतर बुधवारी पवार यांनी गडचिरोलीत येऊन जाहीर सभा घेतली. विदर्भातील दोन दिवसांच्या दौºयाचा शुभारंभ या सभेने झाला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आणि राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, आदी मंचावर उपस्थित होते.
पवार म्हणाले, आम्ही सत्तेत असताना तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना घेऊन यवतमाळ जिल्ह्यात शेतकºयांच्या घरी गेलो होतो. आठ दिवसातच ७१ हजार कोटींची सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. त्या कर्जमाफीनंतर आत्महत्या कमी झाल्या होत्या. परंतु या सरकारने शेतकºयांना दिलेले आश्वासन पाळले नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या नाहीत. शेतीवर ५० टक्के नफा देण्याचा विचारच नाही. परिणामी कर्ज वाढत जाऊन शेतकºयांना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली नाही. आम्ही दिलेल्या योग्य हमीभावामुळे तांदूळ निर्यातीत देश पहिल्या क्रमांकावर तर साखर, कापूस निर्यातीत दुसºया क्रमांकावर आणला होता. पण या सरकारने शेतमाल उत्पादकांना वाºयावर सोडून केवळ ग्राहकांच्या हिताचा विचार केला.
हे सरकार ग्राहकाचे-
आम्ही दिलेल्या योग्य हमीभावामुळे तांदूळ निर्यातीत देश पहिल्या क्रमांकावर तर साखर, कापूस निर्यातीत दुसºया क्रमांकावर आणला होता़ पण या सरकारने शेतमाल उत्पादकांना वाºयावर सोडून केवळ ग्राहकांच्या हिताचा विचार केला़

Web Title:  Suicides caused by debt waiver mistakes: Sharad Pawar Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.