सांगली जिल्ह्यातील जवानाची बंगलोरमध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 05:52 IST2017-01-17T05:52:42+5:302017-01-17T05:52:42+5:30

जवान विजय सुरेश गायकवाड (२९) याने बंगलोर विमानतळावर कर्तव्य बजावत असताना स्वत:वर बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केली.

Suicides in Bangalore in Sangli district | सांगली जिल्ह्यातील जवानाची बंगलोरमध्ये आत्महत्या

सांगली जिल्ह्यातील जवानाची बंगलोरमध्ये आत्महत्या


सांगली : शिराळा येथील केंद्रीय राखीव पोलिस दलात नोकरीस असणारा जवान विजय सुरेश गायकवाड (२९) याने बंगलोर विमानतळावर कर्तव्य बजावत असताना स्वत:वर बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केली.
ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी बंगलोरकडे धाव घेतली.
विजयचा एक महिन्यापूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर तो बेंगलोर येथे नोकरीस गेला होता, तर पत्नी संक्रांतीच्या सणासाठी माहेरी गेली होती. त्याच्या पश्चात पत्नी, भाऊ, वयोवृद्ध आई-वडील असा परिवार आहे. (वार्ताहर)

Web Title: Suicides in Bangalore in Sangli district