दोन चिमुकल्यांसह महिलेची आत्महत्या
By Admin | Updated: January 2, 2017 05:17 IST2017-01-02T05:17:58+5:302017-01-02T05:17:58+5:30
दोन चिमुकल्यांसह महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंदगव्हाण येथे रविवारी घडली. याप्रकरणी महिलेच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

दोन चिमुकल्यांसह महिलेची आत्महत्या
नंदुरबार : दोन चिमुकल्यांसह महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंदगव्हाण येथे रविवारी घडली. याप्रकरणी महिलेच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
सिंदगव्हाण येथील शेतकरी मुरलीधर पाटील (३५) हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. सकाळी ते शेतात गेले असताना त्यांची पत्नी प्रतिभा (३०), व मुले खुशी (८), चेतन (६) हे शेजारच्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. तालुका पोलिसांनी या तिघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवले. प्रतिभाच्या आई, वडील व इतर नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मुरलीधर प्रतिभाच्या मागे पैशांसाठी तगादा लावत होता. शेतीसाठी वेळोवेळी पैसेही दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी मुरलीधर यास ताब्यात घेतले. उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. (प्रतिनिधी)