चारित्र्याचा संशय घेतल्याने महिलेची आत्महत्या
By Admin | Updated: May 19, 2016 18:19 IST2016-05-19T18:19:17+5:302016-05-19T18:19:17+5:30
चारित्र्याचा संशय घेऊन एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना कुमठा तांडा (ता़ उ़ सोलापूर) येथे घडली़ याप्रकरणी पती व सासूविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

चारित्र्याचा संशय घेतल्याने महिलेची आत्महत्या
सोलापूर : चारित्र्याचा संशय घेऊन एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना कुमठा तांडा (ता़ उ़ सोलापूर) येथे घडली़ याप्रकरणी पती व सासूविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मालनबाई संतोष राठोड (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे़ याप्रकरणी संतोष एकनाथ राठोड (वय ३०), जमनाबाई एकनाथ राठोड (वय ५०, रा़ फताटेवाडी, ता़ द़ सोलापूर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ फताटेवाडी येथील राहत्या घरी तू घराच्या बाहेर का बसतेस म्हणून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला़ या त्रासाला कंटाळून मालनबाई हिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली़ याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि कापसे हे करीत आहेत़