नवरा आणि सासूच्या छळामुळे महिलेची आत्महत्या
By Admin | Updated: October 23, 2016 16:31 IST2016-10-23T16:31:21+5:302016-10-23T16:31:21+5:30
पती आणि सासूकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. स्वाती दिवाकर कानतोडे (वय २८) असे मृत महिलेचे नाव

नवरा आणि सासूच्या छळामुळे महिलेची आत्महत्या
dir="ltr">
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 23 - पती आणि सासूकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. स्वाती दिवाकर कानतोडे (वय २८) असे मृत महिलेचे नाव असून ती यशोधरनगरातील विनोबा भावे नगर येथे वास्तव्यास होती.
मोंढा कामठी येथील स्वातीच्या नातेवाईक सुगंधा विजय मारवाडे यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, दिवाकर आणि त्याची आई सिंधूबाई प्रेमलाल कानतोडे हे दोघे स्वातीचा छळ करीत होते. त्यामुळे शनिवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास स्वातीने गळफास लावून आत्महत्या केली. मारवाडे यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी कानतोडे मायलेकाविरुद्ध कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.