महिलेची आत्महत्या; चालकास अटक

By Admin | Updated: July 19, 2016 03:19 IST2016-07-19T03:19:02+5:302016-07-19T03:19:02+5:30

मुलीशी लग्न लावून देण्यासाठी लावलेल्या तगाद्याचा त्रास असह्य झाल्याने गीता साळुंखे (३५) यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली.

Suicide of a woman; The driver is arrested | महिलेची आत्महत्या; चालकास अटक

महिलेची आत्महत्या; चालकास अटक


डोंबिवली : मुलीशी लग्न लावून देण्यासाठी लावलेल्या तगाद्याचा त्रास असह्य झाल्याने गीता साळुंखे (३५) यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला रिक्षाचालक गिरीश बच्छाव (२७) याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
साळुंखे यांच्याशेजारी राहणारा गिरीश त्यांच्याकडे जेवण्यासाठी येत असे. आपल्या मुलीशी माझे लग्न लावून द्या, असा तगादा गिरीशने साळुंखे यांच्याकडे लावला होता. त्यासाठी तो त्यांना त्रास देत होता. मात्र, त्यांनी नकार दिला होता. तरीही, तो त्यांच्याकडे जबरदस्ती करत होता. या मानसिक त्रासाला कंटाळून साळुंखे यांनी रविवारी सायंकाळी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात, त्या जबर भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी साळुंखे यांचा भाऊ योगेंद्र सिंग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी गिरीशला अटक केली. त्याला कल्याण न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे यांनी दिली.

Web Title: Suicide of a woman; The driver is arrested