सोलापुरात 2 पोलीस अधिका-यांच्या पत्नींची आत्महत्या
By Admin | Updated: May 1, 2017 16:20 IST2017-05-01T16:10:41+5:302017-05-01T16:20:56+5:30
सोलापूर पोलीस दलातील दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल्सनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

सोलापुरात 2 पोलीस अधिका-यांच्या पत्नींची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 1 - सोलापूर पोलीस दलातील दोन पोलीस अधिका-यांच्या पत्नींनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. राहत्या पोलीस कॉर्टरमध्ये या दोघींनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. विजयालक्ष्मी शिवप्पा बिराजदार (वय 22) असं कविता नगर पोलीस लाइनमध्ये राहणाऱ्या कॉन्स्टेबलचे नाव आहे.
तर पोलीस मुख्यालयात राहणा-या चारुशिला बंगाळे (32) यांनीही आत्महत्या केली आहे.
दरम्यान या प्रकरणातील आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.