आत्महत्येचा VIDEO - कमकुवत मनाच्या लोकांनी बघू नये
By Admin | Updated: July 16, 2016 14:46 IST2016-07-16T13:16:39+5:302016-07-16T14:46:00+5:30
पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकात एका तरूणाने लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे.

आत्महत्येचा VIDEO - कमकुवत मनाच्या लोकांनी बघू नये
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकात एका तरूणाने लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. १० जुलै रोजी ही दुर्दैवी घटना घडली असून सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाईनंदर स्टेशन मधील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर संध्याकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. या इसमाचे वय ३२ ते ३५ च्या दरम्यान असल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली.
इतर सर्व प्रवाशांप्रमाणे हा इसम भाईंदर स्थानकात लोकलची वाट पाहत उभा होता. आत्महत्या करण्यापूर्वी काही काळ आधी तो कानाला हेडफोन लावून कोणाशी तरी फोनवर बोलत होता. मात्र इतक्यात समोरून लोकल आली आणि त्या तरूणाने रुळांवर उडी मारत लोकल समोर झोकून देत आत्महत्या केली.