मुलीला विहिरीत फेकून आत्महत्या
By Admin | Updated: November 17, 2015 01:29 IST2015-11-17T01:29:50+5:302015-11-17T01:29:50+5:30
दीड वर्षाच्या मुलीला विहिरीत फेकल्यावर पित्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कोरेगाव तालुक्यातील दुधी येथे घडली. या मागचे

मुलीला विहिरीत फेकून आत्महत्या
रहिमतपूर : दीड वर्षाच्या मुलीला विहिरीत फेकल्यावर पित्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कोरेगाव तालुक्यातील दुधी येथे घडली. या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
उमेश भानुदास जाधव (वय ३४, रा. गोडोली, सातारा) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. उमेश हा शनिवारी आपली दीड वर्षाची मुलगी दुर्वा हिला घेऊन, घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता. त्यानंतर तो आजोळी दुधी येथे आले. ‘करतड’ नावाच्या शिवारातील विहिरीत मुलीला फेकून शेजारील झाडाला लटकून त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. उमेशने असे का केले, याविषयी पोलिसांनाही अद्याप माहिती मिळू शकली नाही. (वार्ताहर)