तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By Admin | Updated: November 28, 2015 02:00 IST2015-11-28T02:00:43+5:302015-11-28T02:00:43+5:30

दुष्काळ व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, मराठवाड्यातील ३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

Suicide of Three Farmers | तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

औरंगाबाद : दुष्काळ व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, मराठवाड्यातील ३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. परभणी जिल्ह्यातील परळी आणि पाथरी तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याचा यात समावेश आहे.
परळी तालुक्यातील सिरसाळा येथील गंगाराज गमाजी उजगरे या ६०वर्षीय शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. तर वाघाळा येथील उत्तम किशन जाधव यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. गावातील जुन्या पाणीपुरवठा विहिरीजवळ त्यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी गावकऱ्यांना आढळून आला. उमरगा तालुक्यातील दत्ता ज्ञानोबा काळे (३५) या शेतकऱ्याने विषारी द्रव प्राषन करून आत्महत्या केली़

Web Title: Suicide of Three Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.