एकाची आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: June 23, 2016 19:31 IST2016-06-23T19:31:04+5:302016-06-23T19:31:04+5:30
पिंपळगाव (ब.) येथील इसमाने येथून जवळच असलेल्या चिराई घाटात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

एकाची आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
ऑनलाइन लोकमत,
सुरगाणा (नाशिक), दि. 23 - पिंपळगाव (ब.) येथील इसमाने येथून जवळच असलेल्या चिराई घाटात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळू शिवाजी कडाळे (४०) रा.पिंपळगाव (ब.) ता.निफाड असे असून त्यांनी मानसिक तणावातून नैराश्यपोटी चिराई घाट परिसरातील आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळू कडाळे हे त्यांची मोटरसायकल घेऊन घरातून बाहेर निघून गेले होते. मात्र ते बराच उशिर होऊनही घरी परतले नव्हते. त्यामुळे गुरूवारी सकाळी त्यांचा शोध घेण्यासाठी मयत बाळू कडाळे यांची पत्नि सत्यभामाबाई व त्यांचा भाचा राजू मोरे (रा.सय्यदपिंप्री हे दोघेही सकाळी १० : १५) वाजेच्या सुमारास सुरगाण्याकडे येत असताना चिराई घाटात रस्त्यालगत कडाळे यांची निळ्या रंगाची डिस्कवर (दुचाकी क्र. एम एच १५ सी डब्ल्यु २४३१) हि दिसून आली.
त्यामुळे या दोघांनी चिराई परिसरात शोध घेतला असता एका शेता जवळील आंब्याच्या झाडाला बाळू कडाळे यांनी नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. सदर घटनेची खबर चिराई येथील पोलिस पाटिल गोविंद धुळे यांनी पोलिसांना दिली. यावेळी पोलिस उपनिरिक्षक सचिन गवळी, पो.हवा. पारखे आदिंनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.