ताडदेव येथे वृद्धाची गळफास घेवून आत्महत्या
By Admin | Updated: February 14, 2017 04:09 IST2017-02-14T04:09:46+5:302017-02-14T04:09:46+5:30
ताडदेव परिसरात एकट्या राहत असलेल्या ६२ वर्षांच्या वृद्धाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली.

ताडदेव येथे वृद्धाची गळफास घेवून आत्महत्या
मुंबई : ताडदेव परिसरात एकट्या राहत असलेल्या ६२ वर्षांच्या वृद्धाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. दशरथ उर्फ बापू बाळकृष्ण ताम्हणकर असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी ताडदेव पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ताम्हणकर घरात एकटे असताना सतत गॅलरीत येत असत. मात्र सकाळी ९पर्यंत ते बाहेर आले नाहीत. त्यामुळे शेजारील मंडळींनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने चिंता वाढली. या प्रकरणी त्यांनी ताडदेव पोलिसांना माहिती दिली. (प्रतिनिधी)