अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: November 5, 2016 00:05 IST2016-11-05T00:05:24+5:302016-11-05T00:05:24+5:30

अकोट फैलमधील रेल्वे क्वॉर्टर येथील रहिवासी एका १५ वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री समोर आली.

Suicide by taking a minor daughter's lewd | अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि.04 -  अकोट फैलमधील रेल्वे क्वॉर्टर येथील रहिवासी एका १५ वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री समोर आली. या प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अकोट फैलमधील रेल्वे क्वॉर्टर येथील बबन भालेराव यांची मुलगी दिव्या (१५) ही शुक्रवारी रात्री घरात एकटी असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आतल्या खोलीत आत्महत्या केल्यानंतर काही वेळातच हा प्रकार तिच्या नातेवाइकांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासणी केली असता दिव्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

Web Title: Suicide by taking a minor daughter's lewd