अल्पभूधारक शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: August 28, 2016 23:33 IST2016-08-28T23:33:36+5:302016-08-28T23:33:36+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील कोथळी येथील घटना.

Suicide by taking a leak of a marginal farmer | अल्पभूधारक शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

अल्पभूधारक शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

कोथळी (जि. बुलडाणा): सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून येथील ५0 वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोथळी येथे २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उघडकीस आली.
अजाबराव नारायण सावळे (वय ५0) रा. कोथळी असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्यावर स्टेट बँकेचे ५५ हजार रुपये कर्ज असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास नैराश्य अवस्थेत असलेल्या अजाबराव सावळे यांनी कोथळी शिवारातील शंकर इंगळे यांच्या धुर्‍यालगतच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे त्यांचा कुटुंबाचा आधार गेला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

Web Title: Suicide by taking a leak of a marginal farmer