सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

By Admin | Updated: April 25, 2016 05:20 IST2016-04-25T05:20:16+5:302016-04-25T05:20:16+5:30

सासरच्या जाचाला कंटाळून देवनार येथील २५ वर्षीय यास्मीन खान या विवाहितेने शुक्रवारी आत्महत्या केली.

Suicide Suffering | सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

मुंबई : सासरच्या जाचाला कंटाळून देवनार येथील २५ वर्षीय यास्मीन खान या विवाहितेने शुक्रवारी आत्महत्या केली. देवनार पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करुन सासू आणि दिराला अटक केली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीखातर यास्मीनच्या कुटुंबीयांनी रविवारी घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील वाहतूक अडवली होती. त्यामुळे या परीसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
देवनार येथील रहिवासी असलेल्या यास्मीनचा २०१२ मध्ये ट्रक ड्राईव्हर असलेल्या अक्र म खानसोबत विवाह झाला. त्यानंतर लग्नाच्या काही दिवसात खान कुटूंबियांनी तिच्याकडून गाडीची मागणी केली होती. त्याशिवाय वेळोवेळी तिच्या माहेरच्या मंडळींकडून पैसे उकळण्यात आले. पैशांसाठी तिच्यावर मानसिक आणि शारिरीक अत्याचार करण्यात येत होते. याच दरम्यान तिच्या पतीने दुसरा विवाह करुन तो सौदीला रवाना झाला. ही बाब समजताच यास्मीनने देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शुक्रवारी तिच्या सासरच्या मंडळींनी तिला बेदम मारहाण करुन पुन्हा पैशांची मागणी केली. अखेर या जाचाला कंटाळलेल्या यास्मीनने माहेरच्या घरी येऊन आत्महत्या केल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी रविवारी यास्मीनचे कुटुंबीय रस्त्यावर उतरले.

Web Title: Suicide Suffering