शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत सीआयडी उपअधिक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 14:50 IST

सांगलीमध्ये एका पोलीस  निरीक्षकाने राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देसांगलीमध्ये एका पोलीस  निरीक्षकाने राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सखाहरी गडदे असे आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे.

सांगली-   येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधिक्षक महेश उर्फ सखाहरी गिरजाप्पा गडदे (वय ५१, रा. देवल कॉम्पलेक्स, विश्रामबाग) यांनी गुरुवारी सकाळी आपल्या घरात सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नोकरीत बढती न मिळाल्याच्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

सांगली-मिरज रस्त्यावरील देवल कॉम्पलेक्समधील तिसऱ्या  मजल्यावर गडदे हे पत्नी व दोन मुलांसह रहात होते. तीन महिन्यापासून ते सांगली सीआयडी क्राईम ब्रँचकडे उपअधिक्षक म्हणून रूजू झाले होते. तत्पूर्वी ते तुरची (ता. तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत होते. तीन दिवसापासून ते रजेवर होते.

सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास गडदे यांनी प्लॅटच्या गॅलरीत सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. यावेळी त्यांची पत्नी व दोन्ही मुले झोपेत होती. गोळी झाडल्याचा आवाज त्यांना आला नाही. सकाळी आठच्या सुमारास घरातील मंडळी झोपेतून उठल्यानंतर गडदे यांचा शोध घेतला. ते गॅलरीत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून कुटूंबियांना मोठा धक्का बसला.

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता माने व त्यांचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. गडदे यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

बोराटे यांनी स्वत: घटनेचा पंचनामा केला. गडदे यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्वरमधील सहा गोळ्या होत्या. त्यापैकी चार गोळ्या त्यांनी गादीवरील उशीखाली ठेवल्या होत्या. रिव्हॉल्वरमध्ये दोन गोळ्या लोड केला. त्यापैकी एक गोळी उडाली. तर दुसरी गोळी रिव्हॉल्वरमध्येच अडकून असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

तीन पानी पत्र जप्तमहेश गडदे यांनी आत्महत्येपूर्वी तीन पानी पत्र लिहिले होते. हे पत्र पोलिसांनी जप्त केले आहे. पत्रातील मजकूर पोलिसांनी उघड केला नसला तरी सातत्याने साईट पोस्टिंगमुळे त्यांना नैराश्य आले होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री व पोलिस आयुक्तांनाही पत्र लिहिले होते. पण त्याची दखल घेतली गेली नाही. या नैराश्येतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटूंबियांचे मत आहे. आत्महत्येला घराच्या कोणाला जबाबदार धरू नये. माझी कुणाबद्दल तक्रार नसल्याचे या पत्रात म्हटल्याची चर्चा घटनास्थळी होती.

वडील, भाऊही पोलीस खात्यातमहेश गडदे यांचे वडील गिरजप्पा हे पोलिस खात्यात फौजदार होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा भाऊ गणेश हा सहाय्यक पोलिस निरीक्षक असून ते तासगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. महेश हे पोलिस उपनिरीक्षक म्हणून खात्यात रूजू झाले. त्यांनी अमरावती, विदर्भ परिसरात सेवा बजाविली.

सांगली व कोल्हापूर लाचलुचपत विभागातही ते कार्यरत होते. त्यानंतर त्यांची तुरची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात नियुक्ती करण्यात आली. तीन महिन्यापूर्वी प्रशिक्षण केंद्रातून सीआयडीकडे बदली झाली होती. पोलिस खात्यात दाखल झाल्यापासून त्यांना सातत्याने साईड पोस्टिंगवरच काम करीत होते. शिस्तबद्ध अधिकारी म्हणून त्यांची पोलिस खात्यात ओळख होती.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस