पुण्यात प्रेमी युगूलाची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या

By Admin | Updated: April 30, 2016 10:17 IST2016-04-30T10:17:00+5:302016-04-30T10:17:00+5:30

प्रेमी युगूलाने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे

Suicide by jumping under the train of lover of Pune in Juhu | पुण्यात प्रेमी युगूलाची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या

पुण्यात प्रेमी युगूलाची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या

>ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. 30 - प्रेमी युगूलाने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. हे प्रेमी युगूल हडपसर शिंदे वस्ती येथे राहत होते अशी माहिती मिळाली आहे. दोघेजण रात्री 10.30 वाजता घरातून बाहेर पडले होते. ज्यानंतर घरच्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. शनिवारी पहाटे 3 वाजता दोघांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. 3.30 वाजता दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावर सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलाचं लग्न ठरलं होतं यामुळे नैराश्यातून ही आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
 

Web Title: Suicide by jumping under the train of lover of Pune in Juhu