चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: September 12, 2015 01:21 IST2015-09-12T01:21:38+5:302015-09-12T01:21:38+5:30
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यातील आणखी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीड तालुक्यातील शहाजानपुर येथील अभिमान साहेबराव मते

चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
औरंगाबाद : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यातील आणखी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
बीड तालुक्यातील शहाजानपुर येथील अभिमान साहेबराव मते
यांनी जनावराच्या गोठ्यात
आडुला गमजाने गळफास घेऊन, तर गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील भीमराव गंगाधर चौधरी यांनी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. वसमत तालुक्यातील पार्डी येथे शंकर नरवाडे यांनी आत्महत्या केली. त्याचबरोबर लातूर
तालुक्यातील जेवळी येथील माणिक लक्ष्मीकांत धानोरकर या शेतकऱ्याने आत्महत्या केली.