कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: March 9, 2017 04:04 IST2017-03-09T04:00:42+5:302017-03-09T04:04:03+5:30
सततची नापिकीमुळे मेहकर तालुक्यातील शेतक-याने संपवली जीवनयात्रा

कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
मेहकर (जि. बुलडाणा), दि. ८- तालुक्यातील फर्दापूर येथील ७0 वर्षीय कर्जबाजारी शेतकर्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. लक्ष्मण भिकाजी रजगडे असे मृतक शेतकर्याचे नाव आहे. रजगडे यांची वरवंड शिवारात शेती होती. त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या जानेफळ शाखेकडून ७0 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. परंतु सततची नापिकीमुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. अखेर त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेतला व जीवनयात्रा संपविली.