इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: March 11, 2017 22:06 IST2017-03-11T22:06:17+5:302017-03-11T22:06:17+5:30
दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर अवघड गेल्याने शुभम रामराव झारी (वय २७, रा. बिळूर, ता. जत) याने घरी विषारी द्राव्य प्राशन करून आत्महत्या केली

इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
जत (सांगली), दि. 11 : दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर अवघड गेल्याने शुभम रामराव झारी (वय २७, रा. बिळूर, ता. जत) याने घरी विषारी द्राव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली.
शुभम हा बिळूर येथील गुरुबसवेश्वर हायस्कूलमध्ये शिकत होता. शनिवारी त्याचा इंग्रजीचा पेपर होता. पेपर देऊन तो दुपारी तीन वाजता घरी परतला. त्याची आई शेतात, तर वडील बाहेर गेले होते. लहान बहीणही शाळेत गेली होती. तीन वाजता त्याने विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर त्याची आई घरी आली, पण तो बेशुद्धावस्थेत पडला होता. उपचारार्थ त्याला जत ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
शुभम शाळेत हुशार व मनमिळावू होता. त्याचे वडील माजी सैनिक आहेत. शुभमच्या मृत्यूमुळे बिळूर गावावर शोेककळा पसरली आहे. पुढील तपास जत पोलिस करत आहेत.