अस्वलाचा दोघांवर जीवघेणा हल्ला
By Admin | Updated: May 8, 2016 18:47 IST2016-05-08T18:47:57+5:302016-05-08T18:47:57+5:30
शाम जाधव (38 ) आणि बबन कोल्हे (18) हे दोघे शेळ्या चरवण्यासाठी जंगल परिसरात गेले असता जंगली अस्वलानं त्यांच्यावर हल्ला केला

अस्वलाचा दोघांवर जीवघेणा हल्ला
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 8- जिल्ह्यातील करवंड येथील शाम जाधव (38 ) आणि बबन कोल्हे (18) हे दोघे शेळ्या चरवण्यासाठी जंगल परिसरात गेले असता जंगली अस्वलानं त्यांच्यावर हल्ला केला आहे. पाण्याच्या शोधात भटकत असलेल्या अस्वलाने दोघांवर जीवघेणा हल्ला चढविला आहे. या दोघांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या शेतातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली..तेव्हा एवढी माणसं बघून अस्वलाने तेथून पळ काढला. अस्वलाच्या हल्ल्यात शाम जाधव गंभीर जखमी झाल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे, तर बबन कोल्हे यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.