अभिनेत्री अंजली श्रीवास्तवची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: June 19, 2017 17:51 IST2017-06-19T17:51:09+5:302017-06-19T17:51:09+5:30
मुंबईतील मनोरंजन विश्व अजून एका अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या घटनेने हादरले आहे. नवोदित अभिनेत्री

अभिनेत्री अंजली श्रीवास्तवची गळफास घेऊन आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - मुंबईतील मनोरंजन विश्व अजून एका अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या घटनेने हादरले आहे. नवोदित अभिनेत्री अंजली श्रीवास्तव हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले . अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी धडपडत असलेल्या अंजलीने अंधेरी येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनाचा शेवट केला.
अंधेरीमधली जुहू परिसराती परिमल सोसायटीत राहणाऱ्या अंजलीला तिचे नातेवाईक वारंवार फोन करत होते. मात्र तिच्याकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे चिंतीत झालेल्या तिच्या कुटुंबीयांनी अंजली राहत असलेल्या घराच्या मालकांशी संपर्क साधला. त्यांनी दुसऱ्या चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता त्यांना अंजलीचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
हा प्रकार पाहिल्यानंतर घरमालकांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अंजलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मात्र घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट किंवा अन्य साहित्य हाती लागलेले नाही. त्यामुळे अंजलीच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.