मारहाणप्रकरणी माजी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 15, 2016 18:33 IST2016-07-15T18:33:47+5:302016-07-15T18:33:47+5:30
राजकीय वैमन्यस्यातून झालेल्या मारहाण प्रकरणी माजी आमदार शरद गावीत यांच्यासह जमावाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

मारहाणप्रकरणी माजी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 15 - शहरात गुरुवारी दुपारी राजकीय वैमन्यस्यातून झालेल्या मारहाण प्रकरणी माजी आमदार शरद गावीत यांच्यासह जमावाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी दुपारी शहरातील उड्डाणपुल परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. याबाबत गुरुवारी रात्री उशीरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशिष राजेश नाईक यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार नाईक यांनी केबल वायर तोडल्यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली. तसेच पंचायत समिती सभापती निवडणुकीत आई सभापती झाल्याने त्याचा राग येवून माजी आमदार शरद गावीत, गोविंद गावीत व इतर दहा ते १५ जणांनी उड्डाणपुलावर आपल्यासह आपल्या मित्रांना अडवून मारहाण केली. लाकडी डेंगारे व हाताबुक्यांनी डोक्यावर, पायावर मारहाण केली. या झटापटीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची २५ हजार रुपये किंमतीची चेन देखील गहाळ झाल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
या मारहाणीत आशिष राजेश नाईक यांच्यासह सुकदेव अशोक नाईक व साईनाथ दगडू वळवी सर्व रा.सुंदर्दे हे जखमी झाले.
त्यावरून शरद गावीत यांच्यासह जमावाविरुद्ध दंगलीचा व जिल्ह्यात लागू असलेल्या जमाव बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.