आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पतीविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: October 24, 2016 17:46 IST2016-10-24T17:46:32+5:302016-10-24T17:46:32+5:30
तळोदा येथील माय लेकींचा गळफासाने मृत्यू प्रकरणी अखेर पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोदा येथे २१ आॅक्टोबर रोजी रात्रीमायलेकींचा एकाच वेळी गळफासाने मृत्यू झाला होता.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पतीविरुद्ध गुन्हा दाखल
ऑनलाइन लोकमत
नंदूरबार, दि. 24 - तळोदा येथील माय लेकींचा गळफासाने मृत्यू प्रकरणी अखेर पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा येथे २१ आॅक्टोबर रोजी रात्री अनामिका उर्फ निशू देविप्रसाद दिक्षीत (२८) व निवेशी उर्फ सोना देविप्रसाद दिक्षीत (५) या मायलेकींचा एकाच वेळी गळफासाने मृत्यू झाला होता. आत्महत्या की घातपात याबाबत चर्चा सुरू होती. मयत महिलेचे आईवडील तळोद्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी यासंदर्भात जावयाविरुद्ध फिर्याद दिली. देवीप्रसाद अवधप्रसाद दीक्षित (३२) रा. तळोदा हा पत्नी मयत अनामिका उर्फ निशु देवीप्रसाद दीक्षित (२८) हीच्यामागे माहेरून दोन तोळे सोने व दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावत होता. यासाठी सतत तिचा मानसिक व शारीरिक छळदेखील करीत असे. त्यामुळे तिने मुलीसह आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.