मुंबईतील युगुलाचा कोल्हापुरात आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: February 23, 2016 00:55 IST2016-02-23T00:55:36+5:302016-02-23T00:55:36+5:30
हातकणंगले रेल्वे फाटकाजवळ असणाऱ्या राम मंदिरसमोरील पान टपरीमागे वसई-विरार येथील सोनी मनीष नीळकंठ (३४) आणि अरुण प्रल्हाद नाईक (३६) या दोघांनी विषारी औषध

मुंबईतील युगुलाचा कोल्हापुरात आत्महत्येचा प्रयत्न
हातकणंगले (जि. कोल्हापूर) : हातकणंगले रेल्वे फाटकाजवळ असणाऱ्या राम मंदिरसमोरील पान टपरीमागे वसई-विरार येथील सोनी मनीष नीळकंठ (३४) आणि अरुण प्रल्हाद नाईक (३६) या दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पे्रयसी सोनी नीळकंठ हिचा मृत्यू झाला; तर अरुण याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, वसई-विरार येथून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अरुण प्रल्हाद नाईक आणि सोनी मनीष नीळकंठ हे बेपत्ता झाले होते. सोमवारी पहाटे हातकणंगले येथील इचलकरंजी रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळ राम मंदिरासमोरील पान टपरीमागे हे युगुल बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे मॉर्निंगवॉकला आलेल्यांना दिसले. त्यांनी ही माहिती हातकणंगले पोलिसांना दिली. दोघेही बेशुद्ध असल्यामुळे पोलिसांना त्यांचा पत्ता शोधणे अवघड होते. दोघांच्या शेजारी एक मोबाइल, पाण्याची बाटली आणि नॅपकीन पडला होता. मोबाइलमधील सीमकार्ड फेकून दिले होते. मात्र, हँडसेटमधील नंबरवरून या दोघांचा पत्ता शोधून पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. तरुणी विवाहित असून, तिला १३ वर्षांचा मुलगा आहे. (प्रतिनिधी)