एअर इंडियाच्या विमानात आत्मघाती हल्ल्याचा इशारा

By Admin | Updated: October 24, 2014 18:51 IST2014-10-24T17:54:41+5:302014-10-24T18:51:28+5:30

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या अहमदाबाद - मुंबई आणि मुंबई - कोच्ची विमानात आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Suicidal alert on Air India plane | एअर इंडियाच्या विमानात आत्मघाती हल्ल्याचा इशारा

एअर इंडियाच्या विमानात आत्मघाती हल्ल्याचा इशारा

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २४ - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या अहमदाबाद - मुंबई आणि मुंबई - कोच्ची विमानात आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरी उड्डाण सुरक्षा विभागाला निनावी पत्राद्वारे हा इशारा देण्यात आला असून या इशा-यानंतर मुंबई, अहमदाबाद आणि कोच्ची विमानतळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
नागरी उड्डाण सुरक्षा विभागाला नुकतेच निनावी पत्र मिळाले आहे. 'शुक्रवारी रात्री अहमदाबादहून मुंबईत येणा-या आणि शनिवारी पहाटे मुंबईहून कोच्चीला जाणा-या एअर इंडियाच्या विमानात दहशतवादी आत्मघाती हल्ला करणार आहेत' असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे. या पत्रानंतर मुंबई, कोच्ची व अहमदाबाद येथील विमानतळांवर हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून विमानतळावर प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी केली जात आहे. आपातकालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Suicidal alert on Air India plane