शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात साखर उत्पादनाचा अंदाज चुकला : गेल्यावर्षी इतकेच उत्पादन होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 12:27 IST

राज्यातील १०२ सहकारी व ९५ खासगी अशा १९५ साखर कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते...

ठळक मुद्देसाखरेचे उत्पादन १०७ लाख टनाच्या घरातगेल्यावर्षीच्या हंगामात राज्याचा सरासरी साखर उतारा ११.२४ टक्के , यंदा तो ११.२३ टक्के

पुणे : गेल्या वर्षी पावसाने दिलेली ओढ, हुमणी रोगाचा झालेला प्रादुर्भाव यामुळे राज्यात साखरेचे उत्पादन कमी होईल, असा साखर क्षेत्रातून वर्तविलेला अंदाज चुकवित यंदा देखील साखर उत्पादनाने १०७ लाख टनांच्या घरात उडी घेतली आहे. जवळपास गेल्यावर्षी इतकेच उत्पादन यंदाही होईल, असे स्पष्ट झाले आहे. राज्यातील १०२ सहकारी व ९५ खासगी अशा १९५ साखर कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते. रविवार (दि. ७) अखेरीस राज्यात ९४५.०६ लाख टन ऊस गाळपातून १०६ लाख १० हजार टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्यावर्षीच्या हंगामात (२०१७-१८) ९५३.७३ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखरेचे विक्रमी उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी, जून महिन्यात राज्यात सॅटेलाईट इमेजद्वारे घेतलेल्या अंदाजानुसार २५ टक्के ऊस क्षेत्र वाढल्याचे दिसून आले होते. त्यामुळे यंदा गेल्यावर्षीचा विक्रम मोडीत काढत ११० ते ११५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज वर्तविला होता. अहमदनगर, सोलापूर, मराठवाड्यातील भागात हुमणीची तीव्रता अधिक होती. तर, कोल्हापूर, सातारा, सांगली व पुण्यामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव मध्यमस्वरुपाचा होता. दुष्काळीस्थीती व रोगाचा प्रादुर्भाव यामुळे राज्यात ९५ लाख टनांपर्यत साखर उत्पादनाचा सुधारीत अंदाज वर्तविला. हा अंदाज चुकीचा ठरवित गेल्या वर्षी इतकेच उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या हंगामात राज्याचा सरासरी साखर उतारा ११.२४ टक्के इतका होता. यंदा तो ११.२३ टक्के इतका आहे. अजूनही २९ कारखान्यांचे गाळप सुरु असल्याने, गेल्या वर्षीच्या साखर उत्पादनाच्या जवळ पोहचू असे दिसत आहे. कोल्हापूर विभागातील ३८ कारखान्यांत २१५.२९ लाख टन ऊस गाळपातून २६.६ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. पुणे विभागातील ३२ कारखान्यांतून २०१.६५ लाख टन ऊस गाळपातून २३.३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. खालोखाल सोलापूर जिल्ह्यातील ४४ कारखान्यांनी २०५.४० लाख टन ऊस गाळपामधून २१ लाख टन व अहमदनगरमधील १८ कारखान्यांनी १४६.९६ लाख टन ऊस गाळपातून १६.२ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.  

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार