शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखानदारांनी २ हजार कोटींचे उसबिले थकविले, आरआरसी अंतर्गत कारवाई करा; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:58 IST

सर्वोच्च न्यायालयात एक रकमी एफआरपी'प्रश्नी पुढील आठवड्यात सुनावणी 

कोल्हापूर: राज्यातील १६३ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होवून जवळपास ४० दिवस होवून गेले आहेत. कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाचे जवळपास २ हजार कोटी रूपयाचे उसबिले थकविले आहेत. संबधित साखर कारखान्यांच्यावर आरआरसी अंतर्गत कारवाई करून शेतक-यांची थकीत ऊसबिले तातडीने अदा करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांकडे केली. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे. राज्यामध्ये १६३ साखर कारखान्यांनी १५ नोव्हेंबर अखेर जवळपास १ कोटी १० लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. यापैकी ३४ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी. अदा केली असून १२९ साखर कारखान्यांकडे जवळपास २००५ कोटी रूपयाची एफआरपीची थकबाकी राहिली आहे. यामुळे सदर थकीत एफआरपीची रक्कम १५ टक्के व्याजासह शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत साखर आयुक्तांकडे मागणी केली.एक रकमी एफआरपी'प्रश्नी पुढील आठवड्यात सुनावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात एक रक्कमी एफआरपीच्या विरोधात आव्हान याचिका दाखल करून ऊस उत्पादक शेतक-यांना तीन टप्यात एफआरपी अदा करण्याची मागणी केलेली आहे. या याचिकेची सुनावणी सुरू असून येत्या १७ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये राज्य सरकार , साखर संघ तसेच राज्यातील साखर कारखान्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न देता पुढील आठवड्यात तातडीने सुनावणी ठेवली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडून एफआरपी अदाराज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करून साखर कारखान्यांना पाठीशी घातल्याने राज्यातील साखर कारखाने एफआरपी देण्यास टाळाटाळ करत आहेत. विशेषता मराठवाडा व विदर्भासह सोलापूर व पुणे जिल्ह्यातील कारखान्यांची थकीत एफआरपी जादा राहिलेली असून स्वाभिमानीच्या रेट्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एक रक्कमी एफ. आर. पी. अदा केली असल्याचेही शेट्टी यांनी प्रसिद्दीपत्रकात म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sugar mills owe ₹2,000 crore to farmers; action urged.

Web Summary : Raju Shetti demands action against sugar mills for ₹2,000 crore dues. 129 mills owe FRP, 34 paid fully. Supreme Court hearing next week on FRP payment. Sangli, Kolhapur mills paid due to pressure.