शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखाने करणार उसापासून थेट इथेनॉल निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 05:59 IST

अधिसूचना जारी; अतिरिक्त साखर उत्पादनावर पर्याय

- चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : उसापासून थेट इथेनॉल तयार करण्याला केंद्र सरकारने साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे. यासाठी ऊस नियंत्रण अध्यादेश १९६६ मध्ये सुधारणा करणारी अधिसूचना केंद्रीय अन्न मंत्रालयाने गुरुवारी जारी केली आहे.या अधिसूचनेनुसार कारखान्यांना यापुढे उसाच्या रसापासून किंवा ‘बी मोलॅसिस’पासून थेट इथेनॉल निर्मिती करण्याला परवानगी देण्यात आली. एखाद्या कारखान्यात अशा पद्धतीने तयार होणारे ६०० लिटर इथेनॉल म्हणजे १ टन साखर असे प्रमाण गृहीत धरून उसातील साखरेचा सरासरी उतारा काढला जाणार आहे.मागणी २५० लाख टन असताना यंदा देशात साखरेचे उत्पादन ३२२ लाख टन झाल्याने अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला आहे. साखरेचे दर घसरल्याने कारखाने अडचणीत आल्यामुळे शेतकऱ्यांची सुमारे २२ हजार कोटींची ऊस बिले थकीत होती. ती देता यावीत, कारखाने अडचणीतून बाहेर यावेत यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या. साखरेवरील आयात कर दुप्पट, २० लाख टन साखर निर्यातीला परवानगी, निर्यातीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन ५५ रुपये अनुदान, साखरेचा किमान विक्री दर निश्चित करणे, दरमहा खुल्या बाजारात किती साखर विकायची याचा कोटा कारखान्यांना ठरवून देणे आदींचा त्यामध्ये समावेश आहे.या उपाययोजनेचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यात केंद्राने इथेनॉलचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार ‘बी मोलॅसिस’पासून तयार होणाºया इथेनॉलचे दर प्रतिलिटर ४७.४९ रूपये तर ‘सी मोलॅसिस’पासून तयार होणाºया इथेनॉलचे दर ४३.७० रूपये असे निश्चित केले. हे दर १ डिसेंबर २०१८ पासून लागू होतील. देशात पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याला परवानगी आहे. मात्र, कमी उपलब्धतेमुळे केवळ ४ टक्के इथेनॉलच पेट्रोलमध्ये मिसळले जाते.इथेनॉल प्रकल्पाला बिनव्याजी कर्जयेत्या हंगामात उसाची उपलब्धता जादा असल्याने देशातील साखरेचे उत्पादन ३५५ लाख टनावर जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. इथेनॉल प्रकल्पाला पहिली पाच वर्षे बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र