शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

साखर कारखान्यांना द्यावे लागणार तेराशे कोटींचे व्याज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 07:00 IST

शुगरकेन कंट्रोल ऑर्डरनुसार शेतकऱ्यांचा ऊस गाळपाला गेल्यानंतर १४ दिवसांच्या एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देएफआरपी विलंब करणाऱ्यांना १५ टक्के व्याजासह रक्कम द्यावी लागेलसाखर आयुक्तांच्या निर्णयाचा परिणाम

पुणे : ऊस गाळप केल्यानंतर मुदतीत पैसे न देणाऱ्या साखर कारखान्यांना १५ टक्के व्याजदराने उसाची रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्याचा आदेश साखर आयुक्तालयाने दिला आहे. गेल्या हंगामात एकही कारखाना मुदतीत एफआरपी देऊ शकला नव्हता. त्यामुळे जवळपास १३०० कोटी रुपयांचे व्याज या कारखान्यांना द्यावे लागेल. शुगरकेन कंट्रोल ऑर्डरनुसार शेतकऱ्यांचा ऊस गाळपाला गेल्यानंतर १४ दिवसांच्या एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यावर कारखान्यांना १५ टक्के व्याज द्यावे लागेल. ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही जनहित याचिका स्वीकारुन साखर आयुक्तांना त्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यावर झालेल्या सुनावणीत साखर आयुक्तालयाने वेळेत एफआरपी न देणाºया कारखान्यांनी १५ टक्के व्याजाने एफआरपी द्यावी, असे आदेश दिले आहेत. राज्यातील २०१८-१९च्या ऊस गाळप हंगामामधे एकाही कारखान्याला एफआरपीची रक्कम वेळेत देता आली नाही. शेतकरी संघटनांनी देखील त्यासाठी तीव्र आंदोलन केले होते. राज्यात एफआरपीची सुमारे २३ हजार २९३ कोटी रुपयांची रक्कम कारखान्यांनी ऊस उत्पादकांना देणे लागत होते. त्या पैकी १३ हजार कोटी रुपये विलंबाने दिले गेले. अजूनही ३९७ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. त्याच बरोबर गेल्या गाळप हंगामापुर्वीची देखील २४३.८३ कोटी रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे आहे. गेल्या हंगामात साखर आयुक्तालयाने ८२ कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीफिकेट (आरआरसी) बजावण्याची कारवाई केली होती. एफआरपीच्या वसुलीसाठी संबंधित कारखान्यांची मालमत्ता विकण्याची प्रक्रिया सुरु करण्याचा हा आदेश आहे. याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, साखर आयुक्तालयाने दिलेल्या निर्णयानुसार ऊस गाळपाला आणल्यानंतर १४ दिवसांनी जितकी एफआरपीची रक्कम राहिल त्यावर १५ टक्के व्याज रक्कम दिल्याच्या दिवसापर्यंत द्यावे लागेल. गेल्या हंगामामधे एकही कारखान्याला वेळेत एफआरपी देता आली नाही. त्यामुळे १९५ कारखान्यांना व्याज द्यावे लागेल. संपूर्ण राज्याला हा निर्णय तत्काळ लागू होणार नाही. उच्च न्यायालयात याबाबत याचिका सुरु आहे. मात्र, साखर आयुक्तालयाचा निर्णय दिशादर्शक असेल. या निर्णयाचा आधार पक्षाकारांना होईल. कारण साखर आयुक्तालयाची हीच भूमिका असल्याचे न्यायालय ग्राह्य धरेल.                                             

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने