शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांनी केला साडेतेरा कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 12:18 IST

देशातील ऑईल कंपन्यांनी साखर कारखाने आणि इथेनॉल निर्मिती करणाऱ्या युनिटशी २३७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचा करार केला आहे.

ठळक मुद्देसहा राज्यांना पुरवठा : राज्यातील कारखान्यांना ४७ कोटी लिटरचा कोटाराज्यातील ७२ कारखान्यांची इथेनॉल निर्मितीची क्षमता ५७ कोटी १८ लाख लिटर

पुणे : राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी १३ कोटी ३६ लाख ८४ हजार लिटर इथेनॉलचा पुरवठा केला असून, त्यातील साडेसात कोटी लिटर इथेनॉल सहकारी साखर कारखान्यांनी तयार केले आहे. गुजरात, तेलंगणा, तमिळनाडून, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक या राज्यांनाही इथेनॉलचा पुरवठा केला आहे. सन २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. उसापासून तयार होणाऱ्या  मोलॅसिसपासूनच नव्हे तर, उसाचा रस, खराब धान्य, सडलेले बटाटे, मका आणि अधिक उत्पादन झालेले धान्य या पासूनही इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे. देशातील ऑईल कंपन्यांनी साखर कारखाने आणि इथेनॉल निर्मिती करणाऱ्या युनिटशी २३७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचा करार केला आहे. राज्यातील ७२ कारखान्यांची इथेनॉल निर्मितीची क्षमता ५७ कोटी १८ लाख लिटर आहे. ऑईल कंपन्यांनी सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना ४७ कोटी ६४ लाख ९ हजार लिटर इथेनॉल निर्मितीचा कोटा दिला आहे. सहकारी कारखान्यांची ४० कोटी २७ लाख ५० हजार लिटर इथेनॉल निर्मिती क्षमता आहे. मात्र, सहकारी कारखान्यांना २० कोटी ३३ लाख ७७ हजार लिटर इथेनॉलचा पुरविण्याचा कोटा मिळाला आहे. मार्च अखेरीस, १३ कोटी ३६ लाख ८४ हजार लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला असून, त्यात ७ कोटी ६६ लाख ६६ हजार लिटर इथेनॉल सहकारी कारखान्यांनी पुरविले आहे. अजून राज्यातून २२ कोटी ४४ लाख ९४ हजार लिटर इथेनॉल पुरविणे अपेक्षित आहे. ----------------वारणा कारखान्याकडे लक्षकोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी कारखान्याने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याने साखर उद्योगाचे त्याकडे लक्ष लागले आहे. वारणा कारखान्याला १ कोटी ४५ लाख ५९ हजार लिटरचा कोटा मिळाला आहे. त्यापैकी २६ लाख ५३ हजार लिटर इथेनॉलचा मार्च अखेरीस पुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान खंडोबा डिस्टीलरीज (१० कोटी ४२ लाख ३ हजार लिटर), गंगामाई इंडस्ट्रीज (२ कोटी ६२ लाख ५० हजार लिटर) आणि पद्मश्री विखे-पाटील सहकारी कारखाना (१ कोटी ३१ लाख २१ हजार लिटर) हे सर्वाधिक इथेनॉल पुरवठा करणारे राज्यातले पहिल्या तीन क्रमांकाचे कारखाने आहेत. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प