शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

कमी दराने साखर विक्री करणाऱ्यांवर थेट फौजदारीच, साखर आयुक्तांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 14:57 IST

केंद्र सरकारने साखरेचा निर्धारीत केलेल्या दरापेक्षा कमी दराने साखरेची विक्री करणारे कारखाने व साखर व्यापाऱ्यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचा निर्णय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला. राज्यातील १६ कारखान्यांबाबत आयुक्तांकडे तक्रारी आल्या असून त्यातील ७ कारखाने पश्चिम महाराष्ट्रातील  असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत पुण्यात बैठक घेऊन आयुक्तांनी गुरूवारी कारखान्यांना चांगलीच तंबी दिली.

ठळक मुद्देकमी दराने साखर विक्री करणाऱ्यांवर थेट फौजदारीच, साखर आयुक्तांचा निर्णय१६ कारखाने रडारवर, पश्चिम महाराष्ट्रातील  ७ कारखान्यांचा समावेश?

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखरेचा निर्धारीत केलेल्या दरापेक्षा कमी दराने साखरेची विक्री करणारे कारखाने व साखर व्यापाऱ्यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचा निर्णय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला. राज्यातील १६ कारखान्यांबाबत आयुक्तांकडे तक्रारी आल्या असून त्यातील ७ कारखाने पश्चिम महाराष्ट्रातील  असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत पुण्यात बैठक घेऊन आयुक्तांनी गुरूवारी कारखान्यांना चांगलीच तंबी दिली.यंदाचा हंगामात साखरेच्या दरात घसरण झाल्याने कारखान्यांसमोर पेच निर्माण झाला. साखरेवर बॅँकांकडून मिळणारी उचल आणि ऊसाची एफआरपी यामध्ये मोठी तफावत राहिल्याने शेतकऱ्यांना पैसे देणे अवघड झाले. एफआरपीची रक्कम दोन टप्यात देण्याचा निर्णय घेतला. बाजारातील साखरेचा दरात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा किमान भाव प्रतिक्विंटल २९०० रूपये निश्चित केला.

किमान भाव निश्चित केल्यानंतर साखरेचे मार्केट काही प्रमाणात स्थिर झाले. तरीही एफआरपीचे पैसे देता येईनात. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने फेबु्रवारी महिन्यात साखरेच्या किमान दरात प्रतिक्विंटल २०० रूपयांची वाढ करत तो ३१०० रूपये केला.साखर कारखान्यांना मदत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला पण कारखान्यांनी साखर विक्रीच्या नादात किमान दरापेक्षा कमी दराने साखर विक्री सुरू केली. त्याचा परिणाम थेट बाजारावर होऊन इतर कारखान्यांच्या साखर विक्रीवर परिणाम झाला. ही साखर बाजारात आल्याने बाजारात साखरेचा दर वाढेना. याविरोधात साखर आयुक्तांकडे राज्य साखर संघाने तक्रार केली होती.

याबाबत गुरूवारी आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील कारखानदारांची बैठक बोलावून चांगलीच कानउघडणी केली. १६ कारखान्यांबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यांच्यासह साखर खरेदी करणाºया व्यापाºयांची चौकशी करून संबधितांवर फौजदारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

किमान भाव रद्द होण्याचा धोकाकेंद्र सरकारने शेतकरी व कारखान्यांसाठी साखरेचा किमान भाव निश्चित केला. पण कारखानेच कायद्याची पायमल्ली करणार असतील तर हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय केंद्राच्या पातळीवर होऊ शकतो.

साखर कारखानदारीला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने चांगला निर्णय घेतला. पण कारखानेच स्वताच्या पायावर दगड मारून घेत आहेत. आयुक्तांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे.- पी. जी. मेढे (साखर तज्ञ) 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर