सुखप्राप्तीसाठी आईचा बळी!

By Admin | Updated: December 30, 2014 01:23 IST2014-12-30T01:23:20+5:302014-12-30T01:23:20+5:30

एका महिला मांत्रिकाच्या सल्ल्यावरून अंधश्रद्धेतून स्वत:च्या जन्मदात्या आईचाच बळी देण्याचा अंगावर शहारे आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. मांत्रिकाने आणखी एका महिलेचाही बळी दिला आहे.

Suffer mother! | सुखप्राप्तीसाठी आईचा बळी!

सुखप्राप्तीसाठी आईचा बळी!

महिला मांत्रिक फरार : ठाणे जिल्ह्यातील दोघे भाऊ ताब्यात
घोटी (नाशिक) : ठाणे जिल्ह्यातील काशिनाथ व गोविंद दोरे यांनी सुख लाभत नसल्याच्या कारणावरून नाशिक जिल्ह्यातील टाके हर्ष येथील एका महिला मांत्रिकाच्या सल्ल्यावरून अंधश्रद्धेतून स्वत:च्या जन्मदात्या आईचाच बळी देण्याचा अंगावर शहारे आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. मांत्रिकाने आणखी एका महिलेचाही बळी दिला आहे.
घोटी पोलिसांनी याप्रकरणी दोरे बंधू व त्यांना मांत्रिकाकडे घेऊन जाणाऱ्या त्यांच्या बहिणीला ताब्यात घेतले आहे. महिला मांत्रिक फरार झाली आहे. तिचे नाव कळू शकलेले नाही.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष गावाजवळ एका महिला मांत्रिकाने एका महिलेचा बळी दिल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांना मिळाल्यानंतर त्यांनी घोटी पोलिसांना कळविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी चौकशी केल्यानंतर मंदिर बांधणीच्या नावाखाली महिला मांत्रिकाला सात बळी द्यायचे होते. तिने दोन महिलांचा बळी दिला असून एका महिलेने तिच्या तावडीतून सुटका केल्याने ती बचावल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.
ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दांडवळ येथील काशिनाथ आणि गोविंद दोरे यांची बहीण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष येथे राहते. आपल्याला सुख मिळत नसल्याचे त्यांनी बहिणीला सांगितले. तिने गावातील एका महिला मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी महिला मांत्रिकासमोर व्यथा मांडल्यानंतर तिने तुझी आई आणि बहीण चेटकीण असल्याने तुम्हाला सुख लाभत नसून दोघींचा बळी द्यावा लागेल, असे सांगितले. काशिनाथ आणि गोविंद यांनी दिवाळीत त्यांची आई बुधीबाई पुना दोरे आणि बहीण राहीबाई पिंगळे यांना तिच्याकडे आणले. तिने दोघींना बेदम मारहाण केली व बुधीबाई हिचे डोळे काढले. त्यातच तिचा मृत्यू झाला. मात्र राहीबाई पिंगळे हिने प्रसंगावधान राखत पळ काढला. मात्र महिला मांत्रिकाने बुगीबाई वीर हिचा बळी दिल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाले. (वार्ताहर)

पोलिसांनी सोमवारी राहीबाईला ताब्यात घेतले. तिने घटनेची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी काशिनाथ व गोविंद दोरे यांना ताब्यात घेतले. पोलीस बुधाबाई यांचा पुरलेला मृतदेह मंगळवारी काढणार आहेत.

Web Title: Suffer mother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.