सुधाकर पुजारी, राजेंद्र घुले, संजय कदम मुंबईतच
By Admin | Updated: June 17, 2014 03:39 IST2014-06-17T03:39:57+5:302014-06-17T03:39:57+5:30
राज्य पोलीस दलातील ६७ पोलीस उपअधीक्षक तसेच साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या सोमवारी गृह विभागाने बदल्या केल्या.

सुधाकर पुजारी, राजेंद्र घुले, संजय कदम मुंबईतच
मुंबई : राज्य पोलीस दलातील ६७ पोलीस उपअधीक्षक तसेच साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या सोमवारी गृह विभागाने बदल्या केल्या. त्यात सुधाकर पुजारी, राजेंद्र घुले, संजय कदम आदींचा सहभाग आहे. या तिघांची बदली मुंबईतच करण्यात आली आहे.
पुजारी बहुचर्चित एमपीएससी घोटाळ्याचे तपास अधिकारी होते. तसेच बँकॉक येथे प्राणघातक हल्ल्यातून बचावलेल्या छोटा राजनला भेटण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे जे पथक अधिकृतरित्या गेले होते. त्यातही पुजारी यांचा सहभाग होता. कदम एटीएसमध्ये उपअधीक्षकपदी कार्यरत होते.
एटीएसमध्ये येण्याआधी नागपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी होते. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. घुले हेही एटीएसच्या ठाणे पथकाचे प्रमुख होते. त्यानंतर ठाण्यातच त्यांना एसीपीपदी बढती मिळाली होती.
बदल्या करण्यात आलेले अधिकारी पुढीलप्रमाणे
सुधाकर पुजारी, विशेष सुरक्षा विभाग, मुंबई (मुंबई), बळीराम कदम, महामार्ग पोलीस, ठाणे (मुंबई), प्रज्ञा जेडगे, मालेगांव ग्रामीण उपविभाग, जि. नाशिक ग्रामीण, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई), अशोक जाधव, अक्कलकोट उपविभाग, जि.सोलापूर ग्रामीण (मुंबई), प्रशांत कदम, पंढरपूर उपविभाग, सोलापूर ग्रामिण (आर्थिक गुन्हे शाखा, जि. ठाणे ग्रामीण), शशिकांत बाळकृष्ण भंडलकर, अमरावती शहर (मुंबई), भास्कर धस, वाई उपविभाग, सातारा (ठाणे शहर), यशवंत गाडेकर, जि. रायगड (मुंबई), प्रशांत बगाडे, अलिबाग उप.विभाग, जि. रायगड (मुंबई), डॉ. एस. जी. पखाले, ठाणे शहर (सातारा उपविभाग, जि. सातारा), महेश धर्मराज चिमटे, ठाणे शहर (मालेगांव शहर उपविभाग, जि. नाशिक ग्रामीण), राजेंद्र घुले, ठाणे शहर (मुंबई), संजय रांगणेकर, मेहकर उपविभाग, जि. बुलढाणा (मुंबई), रवींद्र भोसले, समाजकल्याण पुणे विभाग, कोल्हापूर (ठाणे शहर), श्रीनिवास घाडगे, गणेशपुरी उपविभाग, जि. ठाणे ग्रामीण (अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे घटक), प्रशांत देशपांडे, सायबर सेल, जि.ठाणे ग्रामीण (पेण उपविभाग, जि. रायगड), विलास शिंदे, समाजकल्याण विभाग, मुंबई (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई (मा. विधीमंडळ अध्यक्षांच्या परवानगीने पो.आ., मुंबई यांनी करावयाची कार्यवाही), शिवाजीराव देशमुख, गु.अ.वि., कोंकणभवन, नवी मुंबई (महाड उपविभाग, जि. रायगड), कालीदास सुर्यवंशी, गु.अ.वि., पुणे (ठाणे शहर), निताराम कुमरे, नागपूर शहर (नागपूर शहर (अकार्यकारी पदावर), प्रताप धरमशी, नागपूर शहर (मुंबई), अभय शंकरराव येवले,अे.सी.बी. ठाणे (मुंबई), सविता तुरेकर, रा. गु. विभाग, मुंबई (वणी उपविभाग, जि. यवतमाळ), अशोक कामत, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई (मुंबई), संजय कदम, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई (मुंबई), भास्कर पिंगट, अे.सी.बी., औरंगाबाद घटक, औरंगाबाद (गणेशपुरी उपविभाग, जि. ठाणे ग्रामिण) भारतकुमार राणे, मुंबई (कोल्हापूर शहर उपविभाग, जि. कोल्हापूर, शिवाजी विठोबा शेलार, गु.अ.वि., पुणे (नवी मुंबई) (प्रतिनिधी)