शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बडगुजर हे छोटा मासा; बात निकली है, तो बहोत दूर तक जायेगी - दादा भुसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 16:46 IST

ड्रग्ज प्रकरणात माझा अणु -रेणु इतकाही संबंध निघाला, तरी पद आणि राजकारण सोडून देईन, असे दादा भुसे यांनी सांगितले.

नाशिक: सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीनंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे येतील, बडगुजर हे छोटा मासा आहेत. बात निकली है, तो बहोत दूर तक जायेगी असे सांगत नाशिकचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर बडगुजर यांचे समर्थक आणि व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या अन्य तिघांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. याबाबत दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी महाराष्ट्राच्या समोर येतील. 'मैं हूँ डॉन'वर बडगुजर हे अनेक क्रिमिनल आणि देशद्रोह्यांसोबत थिरकले, याचा संपूर्ण भारतीयांना राग आहे. बडगुजर हे छोटा मासा आहेत. बात निकली है. तो बहोत दूर तक जायेगी."

याचबरोबर, या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सुधाकर बडगुजरांना सगळ्या गोष्टींची आठवण होईल. बडगुजर यांच्या चौकशीची मागणी नितेश राणे यांनी केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, असे दादा भुसे म्हणाले. तसेच, यावेळी सुधाकर बडगुजर यांनी ललित ड्रग्ज प्रकरणी केलेल्या आरोपांवरही दादा भुसे यांनी भाष्य केले. ललित ड्रग्ज प्रकरण हे २०२० चे आहे. सुधाकर बडगुजर यांनीच त्याचा शिवसेना प्रवेश घडवून आणला होता. या प्रकरणात माझा अणु -रेणु इतकाही संबंध निघाला, तरी पद आणि राजकारण सोडून देईन, असे दादा भुसे यांनी सांगितले.

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत मुंबई बॉबस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासंदर्भात पार्टीचा मुद्दा उपस्थित केला होता. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्तासोबतचा फोटो आणि व्हिडिओ विधानसभेत दाखवण्यात आला. नितेश राणे यांनी यासंदर्भातील एका व्हिडिओचा दाखवला. त्यात 'मै हूँ डॉन गाण्यावर', सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचा डान्स आहे. या प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली.

बडगुजरसह तीन जण चौकशीच्या फेऱ्यातठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर बडगुजर यांचे समर्थक आणि व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या ३ जणांची पोलिसांनी चौकशी केली. पवन मटाले, रवी शेट्टी, सरप्रीतसिंग या तिघांची पाच तास चौकशी केली. सलीम कुत्ता याच्यासोबत ओळख, भेट आणि संबंध कसा आला, याबाबत पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सलीम कुत्ता याचे नाव मोहम्मद सलीम मीर शेख आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकShiv Senaशिवसेना