शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत एर्नाकुलम एक्स्प्रेसची अचानक तपासणी, रेल्वे जाळपोळीच्या संदेशामुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 22:15 IST

कणकवली पोलीसांच्या पथकासह बॉम्ब शोध व नाशक पथक तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने कणकवली रेल्वेस्थानकात गाडीची तपासणी केली.

कणकवली - कोकण रेल्वे मार्गावरून मडगावच्या दिशेने धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२६१८) ची अज्ञाताकडून तोडफोड करण्याबरोबरच  जाळपोळ होणार असल्याचा संदेश  कोकण रेल्वे प्रशासन , रेल्वे सुरक्षा बल, सिंधुदुर्ग पोलीस नियंत्रणकक्ष यांना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मिळाला . त्यामुळे कणकवली पोलीसांच्या पथकासह बॉम्ब शोध व नाशक पथक तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने कणकवली रेल्वेस्थानकात गाडीची तपासणी केली. मात्र, आक्षेपार्ह काहीच आढळून आले नाही . त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.सध्या देशात ठिकठिकाणी नव्या नागरीकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन पेटले आहे. यापार्श्वभूमीवर रेल्वेच्या चेन्नई येथील दक्षिण विभागाकडून बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयात एक संदेश आला. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२६१८) ची अज्ञाताकडून तोडफोड करण्याबरोबरच  जाळपोळ होणार असल्याचा तो संदेश होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तत्काळ खबरदारी घेत रेल्वे सुरक्षा बल तसेच स्थानिक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली.त्यानंतर पोलिसांच्या सिंधुदुर्ग नियंत्रण कक्षाने कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलीस निरीक्षक  शिवाजी कोळी , हवालदार उत्तम पवार , कमलाकर  साळसकर , अभजित तावडे , कैलास इंपार , राजकुमार खाडे , किरण मेषे , सुयोग पोकळे , रंजित जांभळे , नितीन बनसोडे , मंगेश बावधने यांचे पथक कणकवली रेल्वेस्थानकात दाखल झाले. तर ओरोस येथून  बॉम्ब शोध व नाशक पथक  हवालदार बाबा आंगणे ,  बाबु घाडीगावकर , नाना पिंगे , राहुल वेंगुर्लेकर , सिद्धार्थ तेंडुलकर , समीर कोचरेकर  यांच्यासह कणकवलीत दाखल झाले. त्यांच्यासमवेत शेरा  व लव्हली हे श्वान सुद्धा होते. तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक अरुण लोट , जवान राजेश कांदळकर, भूषण कोचरेकर, मेघशाम हेही उपस्थित होते.  कणकवली  रेल्वेस्थानकात गाडी येताच तिची तपासणी या सर्वानी केली. मात्र , अर्धातास तपासणी करूनही काहीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही.  त्यामुळे सायंकाळी ६.३१ वाजता कणकवलीत दाखल झालेली ही रेल्वे ७ वाजून १ मिनिटांनी गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. दरम्यान, या अचानक तपासणी मुळे रेल्वे प्रवाशी गोंधळून गेले होते. यावेळी रेल्वे स्टेशन मास्तर रंजना माने व अन्य अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी रेल्वेस्थानकातही या गाडीची तपासणी करण्यात आली होती.  

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग