शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

Deglur By-Election: भाजपविरोधात 'शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी' आघाडीचा प्रयोग यशस्वी? देगलूरमध्ये पित्यापेक्षा मुलाला दुप्पट मताधिक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 08:51 IST

अशोक चव्हाण यांचे नियोजन अन् खतगावकरांची साथ ठरली निर्णायक. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली देगलूरची पोटनिवडणूक भाजपसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती.

- श्रीनिवास भोसले    लोकमत न्यूज नेटवर्क    नांदेड : देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या एकतर्फी विजयाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वावर नांदेडकरांनी पुनश्च शिक्कामोर्तब केल्याचे दिसून आले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली देगलूरची पोटनिवडणूक भाजपसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. परंतु, अशोक चव्हाणांनी जनतेसमोर मांडलेला विकासाचा अजेंडा, अंतापूरकर कुटुंबीयांविषयी असलेली सहानुभूती अन् ऐनवेळी भाऊजींनी मेहुण्यांना दिलेली साथ निर्णायक ठरली. त्यामुळे या निवडणुकीत पित्याच्या मताधिक्यापेक्षा दुप्पट मताधिक्य मिळवत जितेश अंतापूरकर यांनी ४१ हजार ९३३ मतांनी भाजपचे सुभाष साबणे यांचा पराभव केला.   

महाविकास आघाडीच्या राज्यपातळीवर झालेल्या निर्णयानुसार देगलूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली. काँग्रेसने अंतापूरकर कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहून दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश यांना उमेदवारी दिली. यामध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. तर भाजपने  पक्षातून उमेदवारी मागणाऱ्या १२ जणांना डावलून शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली. ऐनवेळी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा साबणे यांचा हा निर्णय शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला. 

महाविकास आघाडी अधिक मजबूत  महाविकास आघाडीविरुद्ध भाजप आणि दुसरीकडे अशोक चव्हाण विरूद्ध प्रतापराव चिखलीकर असे चित्र मतदारसंघात तयार करण्यात आले होते. परंतु, चव्हाण यांनी विकासाचा अजेंडा लोकांसमोर मांडला. वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांकडे दुर्लक्ष करत महाविकास आघाडी सरकार एकजुटीने राज्याचा विकास करत आहे. हा विश्वास मतदारांना देण्यात पालकमंत्री चव्हाण यशस्वी ठरले. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एका गटाची छुप्या पद्धतीने मदत घेण्याचा भाजपचा डावही अशोकरावांनी हाणून पाडला.

खतगावकरांचे पाठबळ ठरले महत्त्वपूर्ण    माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी ऐनवेळी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करत अशोक चव्हाण यांना साथ दिली. नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण भाजप सोडत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे ही निवडणूक खतगावकर यांच्यासाठीही प्रतिष्ठेची होती. त्यांच्या स्नुषा जि. प. सदस्या डॉ. मीनल खतगावकर यांनी युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जितेश यांच्या विजयासाठी घेतलेले परिश्रमही मताधिक्यासाठी कामी आले.

टॅग्स :deglur-acदेगलूरcongressकाँग्रेसBJPभाजपा