पोटात सेल फुटलेल्या चिमुरडीवर यशस्वी शस्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 18:59 IST2016-11-10T18:59:43+5:302016-11-10T18:59:43+5:30
दीड वर्षांच्या चिमुरडीने बटन सेल (चपटा सेल) गिळला. तो पोटात फुटल्याने गंभीर जखमी झालेल्या या चिमुरडीवर आकुर्डी येथील एका हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्रक्रिया

पोटात सेल फुटलेल्या चिमुरडीवर यशस्वी शस्रक्रिया
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 10 - दीड वर्षांच्या चिमुरडीने बटन सेल (चपटा सेल) गिळला. तो पोटात फुटल्याने गंभीर जखमी झालेल्या या चिमुरडीवर आकुर्डी येथील एका हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्रक्रिया करण्यात आली.
प्रांजल गुंड असे त्या चिमुरडीचे नाव आहे. गुंड कुटुंबिय निगडी साने चौक येथे राहते. आईने टीव्हीचा रिमोट दिला होता. त्यामुळे खेळताना बटन सेल प्रांजल हिने गिळला. त्याआधी तो सेल चावला होता. त्यामुळे तिची जीभ तोडी जळली होती.
प्रांजलची आई शीतल गुंड यांना ही बाब समजतात त्यांनी तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टर तपासणी करत असतानाच त्या सेलचा प्रांजलच्या पोटात स्फोट झाला. त्यामुळे डॉ. संदेश गावडे, डॉ. मंदार डोईफोडे, डॉ. नीता भोंडे, डॉ. प्रमोद कुबडे यांनी तत्काळ प्रांजल हिच्यावर इंडिस्कोपी करून तो सेल बाहेर काढला. या स्फोटात प्रांजल हिच्या अन्न नलिकेला गंभीर इजा झाली होती. शस्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर दोन दिवसानंतर प्रांजल आता बरी झाली असून, तिला आज घरी सोडण्यात आले आहे.