शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
4
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
5
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
6
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
7
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
8
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
9
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
10
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
11
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
12
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
13
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
14
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
15
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
16
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
17
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
18
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
19
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
20
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या संस्कारामुळे ५० वर्षांच्या सार्वजनिक जीवनात यशस्वी

By admin | Updated: April 24, 2017 03:13 IST

बाळंतीण झाल्यानंतर चौथ्या दिवशीच शरद नावाच्या बाळाला सोबत घेऊन स्वातंत्र्य चळवळीच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या

औरंगाबाद : बाळंतीण झाल्यानंतर चौथ्या दिवशीच शरद नावाच्या बाळाला सोबत घेऊन स्वातंत्र्य चळवळीच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या ‘आई’ने बालपणी केलेल्या संस्कारामुळेच ५० वर्षांच्या सार्वजनिक, सांस्कृतिक जीवनात यशस्वी झालो, असे भावोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाला आणि नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार मराठी रंगभूमीवर लक्षणीय कार्य केल्याबद्दल डॉ. जब्बार पटेल यांना रविवारी मसापच्या नाट्यगृहात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी विचारमंचावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कौतिकराव ठाले पाटील, मधुकरअण्णा मुळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, कवी ना. धों. महानोर, डॉ. मनोहर जाधव, डॉ. दिलीप घारे, किरण सगर आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी मराठी भाषा, रंगभूमीवर भाष्य केले. मराठी भाषा ही वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी आहे. मुंबईतील मराठी भाषेत सर्व देशातील भाषांचे मिश्रण पाहायला मिळते. तर पुणे, कोल्हापूर, सातारा, विदर्भ, मराठवाड्यातील मराठी भाषेचे विभागानुसार वेगळेपण आढळते. या सर्वांमध्ये मराठवाड्यातील संतांची भूमी वेगळीच आहे. या भूमीत पे्रमाचा ओलावा जाणवतो. याची प्रचीती अनेक वेळा आलेली आहे. यामुळे ‘मसाप’ने दिलेल्या पुरस्काराचे मोल असल्याचे पवार यांनी सांगितले. मी लिहिलेल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्यामुळे आणखी काही लिहावे असे वाटत आहे. परंतु सार्वजनिक जीवनातून वेळ मिळेल की नाही, हे सांगता येत नसल्याचे पवार म्हणाले. ....अन् मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबलायशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना गेवराईहून पैठणमार्गे औरंगाबादला येत होते. तेव्हा पैठणजवळ एका वृद्ध महिलेने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला हात केला. तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी गाडी थांबविण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. मात्र, त्या वृद्ध महिलेकडे चव्हाण गेले तेव्हा तिने त्यांच्या हातात एक चांदीचे नाणे टेकवले. कारण काय तर तू राज्यासाठी चांगले काम करतोस याचे बक्षीस म्हणून. असा प्रेमाने ओतप्रोत भरलेला मराठवाडा असल्याचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला. (प्रतिनिधी)