गिरगाव आगीप्रकरणी पालिका आयुक्तांकडे चौकशी अहवाल सादर
By Admin | Updated: February 24, 2016 15:54 IST2016-02-24T15:37:20+5:302016-02-24T15:54:47+5:30
'मेक इन इंडिया' सप्ताहअंतर्गत गिरगाव चौपाटीवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र रजनी सोहळ्यातील आग प्रकरणी पालिका आयुक्तांकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे

गिरगाव आगीप्रकरणी पालिका आयुक्तांकडे चौकशी अहवाल सादर
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २४ - 'मेक इन इंडिया' सप्ताहअंतर्गत गिरगाव चौपाटीवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र रजनी सोहळ्यातील आग प्रकरणी पालिका आयुक्तांकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे. पालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आलेल्या या चौकशी अहवालात गॅस सिलेंडर, प्लायवूड तसंच ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात आलं आहे. या चौकशी अहवालात मंचाच्या खाली ठेवण्यात आलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग वाढली असल्यांचदेखील सांगण्यात आले आहे. महत्वाच म्हणजे 13 एप्रिलला केलेल्या पाहणीत गॅस सिलेंडर न वापरण्याचा सल्ला आयोजकांना दिला असतानादेखील गॅस सिलेंडरचा वापर करण्याच आल्याच अहवालात सांगितलं आहे.